अकोल्यात दिर आणि वहिनीची नजरानजर झाली, भाऊ नसतांना घरी येत शारिरीक सुख घ्यायचा अन् काल पोलिसांसह शेजार्यांचे हौशचं उडाले

अकोला : २३ तारखेला पत्नीने तातडीने पतीला रुग्णालयात नेलं. पतीची प्रकृती खालवल्याने त्यांना अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत्य घोषित केलं. पतीच्या मृत्यूची बातमी कळताच पत्नीने एकच आक्रोश केला. ढसाढसा रडण्यास सुरुवात केली. तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याचं तिनं सगळ्यांना भासवलं. पण हे मुळात दुःख नव्हतं. तर तिच्यासाठी ही सुखाची चाहूल होती.

होय, पतीच्या मृत्यूची बातमी मिळतात पत्नी मनातून खुश झाली होती. तिच्यासाठी पतीचा मृत्यू म्हणजे तिच्या प्रेमाचा मार्ग मोकळा झाला होता. सुरुवातीला पत्नीने आपल्या पतीला दारूचे व्यसन होतं. त्याला नेहमी रक्ताच्या उलट्या व्हायच्या असं रुग्णालयात सांगितलं. मृत्यूच्या १५ दिवसांपूर्वीही त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी पत्नीच्या सांगण्यावरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पण पोलिसांना कुठेतरी या मागे संशय जाणवला. म्हणून पोलिसांनी धागेदोरे शोधले असता अशी काही माहिती समोर आली की पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली.

नवऱ्याचा खून केला त्याच्याच मावस भावासाठी…
चेहऱ्याने साधी भोळी दिसणारी पत्नी असं काही कृत्य करू शकते यावर त्यांचा विश्वासच बसेना. अकोला शहरातील खडकी परिसरातील म्हाडा कॉलनीमध्ये ही घटना घडली. इथे रहिवासी असलेले आकाश इंदोरे यांचा त्यांच्याच पत्नीने खून केल्याचं समोर आलं. सगळ्यात धक्कादायक म्हणजे हा खून केला तो पतीच्याच मावस भावासाठी. होय, तुम्ही वाचताय ते खरं आहे.

हळूहळू प्रेमाचं फुल उमललं अन्…
आकाश इंदोरे यांच्या पत्नीचे नाव दिव्या असे होते. लग्नानंतर पती आकाश यांचा मावसभाऊ अजय संतोष मांजरे सातत्याने घरी यायचा. यामध्येच दिव्याची आणि त्याची नजरानजर झाली. दोघांमध्ये हळूहळू प्रेमाचं फुल उमललं. आकाश नसतानाही अजय घरी यायला लागला आणि यामुळे दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. रोजच्या भेटीमुळे प्रेमाचे सूज जुळलं. प्रेमानंतर शारीरिक संबंधही सुरू झाले आणि ते दोघं अखंड एकमेकांच्या प्रेमात बुडाले.

दीराच्या प्रेमात वेडी झाली वहिणी…
या दोघांचं नात इतकं पुढे गेलं की आता पतीची अडचण होऊ लागली होती. दोघांनाही आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात करायची होती. परंतु मध्ये येत होता तो पती. त्यामुळे अजय आणि दिव्याने आपल्या प्रेमासाठी थेट पती आकाश याला ठार करायचा निर्णय घेतला. दीराच्या प्रेमात वेड्या झालेल्या या वहिणीने क्रुरतेचा कळस गाठला आणि पतीला संपवलं.

पोलिसांचा संशय ठरला खरा….
सुरुवातीपासूनच पोलिसांना या घटनेमध्ये काहीतरी संशयास्पद जाणवलं. त्यामुळे आकाशच्या मृत्यूच्या २५ दिवसांनी शवविच्छेदनाचा अहवाल मागवून घेतला. यात आकाश शिंदोरे यांचा मृत्यू हा आकस्मित नसून त्याचा गळा आवळून खून केल्याचं समोर आलं. त्यामुळे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पोलिसांनी अधिक चौकशी केली असता पत्नी दिव्या आणि मावस भाऊ अजय संतोष मांजरे यांचं प्रेम प्रकरण असल्याचं समजलं.

यानंतर पोलिसांनी तातडीने चक्रं फिरवली आणि दोघांना ताब्यात घेण्यात आलं. दोघांचीही कसून चौकशी झाली. अखेर त्यांनी आकाशची हत्या केल्याची कबुली दिली. खदान पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन दोघांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *