अकोल्यात सुनेचा गेम, मध्यरात्री सासर्यासह पतीना गळा आवळुन सुनेला केलं ठार तर सासुनां…कारण ऐकुण पोलिसांचेही उडाले हौश

अकोला : पती आणि सासू-सासर्‍यानेचं कट रचून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी पती आणि सासू, सासर्‍याला अटक केली. हत्येची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रं हाती घेतली. तपास करत असताना हत्येचे धागेदोरे मृत महिलेच्या पती अन् त्याच्या आई-वडिलांपर्यत पोहोचले.

जया गोपाल पातोंड (वय ३२, राहणार दहीगांव अवताडे, ता. तेल्हारा) असं खून करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. दरम्यान, जया शेतात कामासाठी जायला सतत नकार देत असल्याने या तिघांनी तिला संपवलं. तिचा खून केल्यानंतर ही आत्महत्या असावी, असं प्राथमिक दर्शनी भासवून देण्यात आलं होतं.

काय आहे संपूर्ण घटना?
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम दहिगाव अवताडे येथील ३२ वर्षीय विवाहितेचा काल बुधवारी (२१ जून) सकाळी ६च्या सुमारास गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. जया गोपाल पातोंड असं तिचं नाव असून तिच्या पतीच्या जबानी रिपोर्टनुसार पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली.

या प्रकरणी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी पोलिसांनी पाठविला होता. परंतु, रात्री उशिरा वैद्यकीय अहवालात धक्कादायक बाब समोर आली आहे.जया हिची आत्महत्या नसून तिचा गळा वळून खून करण्यात आला असल्याचं वैद्यकीय अहवालात स्पष्ट नमूद होतं. हत्येची घटना समोर आल्यानंतर तेल्हारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड यांनी तपासाची सूत्रं हाती घेतली.

तपास करत असताना हत्येचे धागेदोरे मृत महिलेचा पती गोपाल समाधान पातोंड, सासरा समाधान किसन पातोंड आणि सासू देवकाबाई पातोंडपर्यत पोहोचले. या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान आरोपींनी कुणाच्या खून केल्याची कबुली दिली. आज तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

आधी जयाने आत्महत्या केल्याचं भासवलं…
जयाचा पती गोपाल याने पोलीसांना सुरुवातीला म्हटलं होतं की १० वर्षांपूर्वी आमच्या दोघांचे लग्न झालं. लग्नानंतर दोन मूलं झाले, मुलगी ८ वर्षाची अन् मुलगा दीड वर्षाचा आहे. अगदी सुखात संसार सुरू होता. कोणतेही वाद झाले नाही. आई वडिलांनीही म्हणजे सासू-सासर्‍यांनी कधीच पत्नी जया हिला दुखावलं नाही. दरम्यान २० जूनच्या रात्री ८ वाजता कुटुबियांनी सोबत जेवण केले.

रात्री ‘मी’ आणि वडील समाधान किसन पातोंड हे दोघे शेतात झोपायला गेलो. दुसऱ्या दिवशी म्हणजे काल २१ जूनला वडीलांसह गोपाल सकाळी ६ वाजता घरी आला, आणि रूममध्ये गेले असता टिनाच्या रूममध्ये लाकडी बल्लीला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत पत्नी जया दिसली. स्वतः हातांनी तिला खाली उतरविले व रूममधील लाकडी पलंगावर ठेवले. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

या कारणांवरून केली हत्या अन् असा रचला कट…
जया आणि गोपालमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सतत वाद व्हायचा. या वादाला वैतागून जया नेहमी सासर सोडून माहेरी राहायला जायची. मागील महिन्यामध्ये दोघा पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. तिने रागाच्या भरात घर सोडलं आणि माहेरी जाऊन राहू लागली. काही दिवसानंतर दोघांची समजूत काढण्यात आली, परत संसार थाटायला पतीसोबत रवाना झाली.

परंतु, गोपाल तिच्यावर शेतात कामाला जाण्यासाठी खूप दबाव आणायचा आणि जयाचा शेतात जायला स्पष्ट नकार होता. या कारणांवरून दोघांमध्ये सतत वाद व्हायचा आणि या वादातूनच हे हत्याकांड घडलं.सुमारे २० जूनच्या मध्यरात्रीनंतर पती आणि सासऱ्यानं जयाचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर ही आत्महत्या असावी, असं भासवून देण्यासाठी घरातीलच रूममध्ये नायलॉनच्या दोरीने तिचा मृतदेह अडकून दिला.

दोघेजण घराबाहेर पडले, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता घरी परतले असता जयानं आत्महत्या केली असा आरडाओरड सुरू केला आणि गावकऱ्यांना जमा केलं. अशा प्रकारे पत्नी सासू-सासर्‍यांनी जयाच्या आत्महत्येचा बनाव रचला होता. यावेळी सासू दोन्ही नातवांना घेऊन शेजारील रूममध्ये झोपली होती. दरम्यान, जयाच्या हत्येमागील मूळ कारण अद्याप कळू शकले नाही, तसेच या घटनेत मुख्य भूमिका कोणाची? या हत्याकांडात आणखी लोक सहभागी आहे का? या दिशेनेही पोलीस तपास करत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *