अकोल्यात १५ वर्षाच्या मुलानी कामावरुन येतांना आईला अर्धवट जाळुन झुडपात फेकलं, निर्लज पोराच्या तोंडुन कारण ऐकाचं

अकोला : अकोला जिल्ह्यातील दहीगाव गावंडे शेत शिवारात एका ४० वर्षीय विधवा महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या महिलेच्या डोक्यावर अन् अंगावर ठिकठिकाणी दगडानं मारल्याच्या जखमा होत्या. अखेर या हत्या प्रकरणाचा अकोला पोलिसांनी उलगडा केलाय. या महिलेच्या हत्येमागे तिच्याच पोटच्या १५ वर्षीय मुलाचा हात असल्याचं समोर आलंय.

या हत्येचं मूळ कारण देखील समोर आलं आहे. मुलानं पोलिसांना सांगितलं की, आई त्याला अनेकदा ओरडायची, त्याच्यावर रागवायची. ४ जून रोजीही दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. वाद वाढल्यामुळे संतापाच्या भरात त्याने कट रचला अन् आईचा दगडानं ठेचून खून केला. संगीता राजू रवाळे (वय ४० वर्ष रा. ब्राम्हणवाडा जि. वाशीम ह.मु. दहीगाव गावंडे, अकोला) असं या मृत महिलेचं नाव आहे.

काय होतं नेमकं प्रकरण?
अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलिस स्टेशन हद्दीतील ग्राम दहीगाव गावंडे येथील मृतक संगीता राजु रवाळे (वय ४० वर्ष रा. ब्राम्हणवाडा जि. वाशीम ह.मु. दहीगाव गावंडे) हिच्या पतीचं निधन झालं असून, तिला दोन मुले आहेत. गेल्या तीन चार वर्षांपासून माहेरी म्हणजेच दहीगाव गावंडे इथे ती राहत होती.

रविवार म्हणजे ४ जूनपासून संगीता ही गावातून बेपत्ता झाली होती. दरम्यान, मंगळवारी (६ जून) सायंकाळी दहीगाव गावंडे येथील शेतशिवारात एका खड्ड्यात तिचा मृतदेह आढळून आला. मृतदेह काटेरी झुडुपात टाकलेला होता. मृतदेह हा अर्धवट जळालेल्या अवस्थेत असल्याने तिचा खून केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर या प्रकरणात बोरगाव म्हणजे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या हत्येचा तपास अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने हाती घेतल्यानंतर आज संपूर्ण हत्येचा उलगडा झालाय. संगीता हिच्याच पंधरा वर्षे पोटच्या मुलानं तिची (आईची) हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. हा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गोपाल जाधव यांनी केला आहे

सारखी रागवायची म्हणून आईला संपवलं
पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असता, मृतक संगीता हिच्याच मुलाला चौकशीसाठी बोलावून विश्वासात घेतले. त्यानंतर त्याने आपल्या आईची कट रचून हत्या केल्याचं पोलिसांना सांगितलं. त्याची आई त्याला अनेकदा ओरडायची, त्याच्यावर रागवायची. मुलाने शिक्षण सोडून दिलं होतं, म्हणजेच शाळेत जाणं बंद केलं होतं. त्यामुळे शाळेत जाण्यासाठी आई नेहमी त्याला रागवायची. हत्येच्या दिवशी देखील आई आणि मुलामध्ये बाचाबाची झाली. वाद वाढल्यामुळे संतापाच्या भरात त्यानं आईला संपवलं.

असा रचला आईच्या हत्येचा कट
मृत संगीता कामासाठी पारसला रेल्वेने ये-जा करत असे. दररोज प्रमाणे ४ जून रोजी देखील दहिगाव गावातून शेत रस्त्याने मिर्झापुर मार्गे बोरगांव मंजू रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी निघाली होती. संगीता ही रस्त्याच्या मधोमध म्हणजेच सामसूम शेत रस्त्यात पोहोचली असता, तेव्हा तिच्याच मुलाने इथं येत दगडाने आईच्या डोक्यावर, तोंडावर व शरीरावर ठिकठिकाणी वार खून केला.

हत्येनंतर मृतदेह कोणाला दिसून येऊ नये याकरीता रस्ताच्या बाजूला असलेल्या नाल्यामध्ये टाकून त्यावर काटेरी झुडपं टाकून झाकून टाकलं. पुढं ६ जून रोजी तिचा मृतदेह आढळून आला अन् संपूर्ण हत्याकांडाचा खुलासा झाला. पुढील तपास बोरगाव मंजू पोलिस स्टेशन संजय खंदाडे हे करीत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *