‘अगं तु माझी मागच्या जन्माची बायको आहे, असं म्हणतं बाबाने तिला ठाण्यातुन दिल्लीला नेलं अन् पुढं तिच्या…

ठाणे – आपल्याकडे अनोखा शक्ती असुन कॅन्सरसारखा दुर्धर आजार बरा करु शकतो असा दावा करणा-या एका ढोंगीबाबाविरोधात ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.एका ३० वर्षीय महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी साईलाल हिरालालजी जेठीया विरोधात गुन्हा दाखल केला आहे.सदर महिलेने साईलालवर ३ लाख रुपयांची फसवणूक आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे.

मुळचा गुवहाटीच्या असणा-या साईलाल जेठियाची 2015 मध्ये पीडित महिलेसोबत ओळख झाली.साईबाबांची शक्ती माझ्या अंगात असुन कॅन्सर रुग्णांना आपण झटक्यात बरे करु शकतो या त्याच्या दाव्यावर महिलेचा विश्वास बसला.पीडित महिलेचे बाबा कॅन्सरने ग्रस्त असल्याने ती सहज त्याच्या जाळयात अडकली गेली.कर्करोग बरा करण्यासाठी काही विधी करावे लागतील असे सांगुन त्याने पिडीतेकडुन तब्बल 3 लाख रुपये उकळले.

कहर तर तेव्हा झाला जेव्हा ढोंगी साईलाल जेठियाने पीडित महिलेला ति त्याची गतजन्मातली बायको असल्याचे पटवुन दिले आणि तिच्याबरोबर शरीरसंबंध ठेवायला सुरुवात केली.साईलालच्या गोंड बोलण्यामध्ये पुरेपुर फसलेली हि महिला त्याच्यासोबत दिल्ली,आसामपर्यंत जाऊन आली.

त्याठिकाणी वेगवेगळया लाॅजमध्ये आरोपीने या महिलेसोबत शारिरीक संबंध ठेवले.जेव्हा पीडित महिलेने सेक्सला विरोध सुरु केला तेव्हा ढोंगी बाबाने या शरीरसंबंधांचे video सोशल मिडीयावर अपलोड करण्याची धमकी तिला दिली.हा ढोंगी बाबा २ वर्ष तिच्यावर अत्याचार करत होता.जेव्हा त्याचे अत्याचार असह्य झाले तेव्हा पीडित महिलेने हिम्मत एकवटुन पोलीस स्टेशन गाठत त्याच्याविरुध्द तक्रार नोंदवली.

पोलिसांनी आरोपी साईलालच्या विरोधात बलात्कार,गुन्हेगारी कट आणि फसवणुक अशा विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.सध्या साईलाल जेठीया फरार असुन पोलीस त्याच्या शोधात आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *