अचानक बिपट्या पाहिल्यानं कुत्र्यानी सेकंदात सोडले प्राण, मृत्यूचा भयंकर व्हिडीओ व्हायरल

प्राणी असो वा माणुस, सगळ्यांनाच भीती हि वाटते.साक्षात मृत्यू समोर उभा राहिला की कोणाचीही भीतीनं गाळण उडते.राजस्थानमध्ये असाच एक प्रकार घडला आहे.एका कुत्र्याचा हार्टअटॅकने मृत्यू झाला आहे.हि घटना cctv मध्ये कैद झाली आहे.

राजस्थानच्या जोधपुरमध्ये गुरुवारी रात्री एका गावात बिबट्या घुसला.बिबट्या रस्त्यावरून जात होता.बिबट्याला पाहताच कुत्रा प्रचंड घाबरला.बिबट्या दिसताच भीतीने कुत्र्याला हृदय विकाराचा झटका आला आणि त्यानी जागीचं प्राण सोडले.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत २ कुत्रे दिसत आहेत.दुरून एक प्राणी येत असल्याचं पाहुन आधी कुत्रे त्याच्या दिशेने गेले.पण तो प्राणी बिबट्या असल्याचं पाहताचं कुत्रे उलट्या दिशेनं धावत सुटले.याच गडबडीत दोन्ही कुत्रे जमिनीवर पडले.बिबट्याच्या जवळ असलेल्या एका कुत्र्यानं तर धसकाच घेतला.याच धसक्यामुळे त्याला हृदय विकाराचा झटका आला आणि त्यानी जागीचं प्राण सोडल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *