अनोखी शक्कल! दानपेटीवर डल्ला मारला पण सीसीटीव्हीत चोरटे दिसलेचं नाही, वेगळीचं ट्रिक वापरली

नाशिक : नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या मंहिरात दानपेटीवर डल्ला मारल्याच्या प्रकरणी अखेर कळवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विश्वस्त मंडळाकडुन देण्यात आलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला आहे.तब्बल २० दिवसांनी हे प्रकरण समोर आल्याने संपुर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

चोरट्यांनी चोरी करण्याआधी cctv कॅमेऱ्याला चुना लावला होता.याशिवाय cctv सारखा कडक पहारा असतांना दानपेटीवर कोणी डल्ला मारला.यासोबतचं बर्याचं नोटा जळालेल्या अवस्थेत सापडल्यानं आल्यानं खळबळ उडाली आहे.दरम्यान पोलिसांच्या तपासात आता कोणत्या गोष्टी समोर येतात हे पाहणं महत्वाचे असेल.

साडेतीन शक्तीपिठापैंकी अर्धेपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी देवीच्या मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारण्यात आला.या किती रक्कम व इतर वस्तु चोरी गेल्या आहेत याबाबत खात्री नाही.जिथे दानपेटी होती तिथे सीसीटीव्ही कॅमेरा होता.त्यामुळं आधी सीसीटीव्हीला चुना लावण्यात आला आहे.त्यानंतर चोरट्यांनी संधी साधुन दानपेटीवर डल्ला मारलायं.विशेष बाब म्हणजे दानपेटीतील बर्याचं नोटा या जळालेल्या अवस्थेत आढळल्या आहेत.चोख सुरक्षा व्यवस्था असतांना चोरीची घटना घडल्याने भलतीचं चर्चा सुरू झाली आहे.

सुरक्षा व्यवस्थेवर लाखों रुपये खर्च केले जातं असतांनाही अशी चोरी झाल्याने गडावरील सुरक्षेवर प्रश्न लोक उपस्थित करत आहे.विश्वस्त दीपक पाटोदकर यांनी याबाबत पत्र दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गडावर सुरक्षारक्षकांसह cctv सारखा कडा पहारा असताना मंदिरात चोरी झाल्याने एकुणच सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *