…अन् माऊलीने स्वत: पाहिले मुलाला तडफडुन प्राण सोडतांनी, अकोल्यात शेतकर्याचा दुर्देवी मृ्त्यू

अकोला : आपल्या पिकांचं नुकसान होऊ नये म्हणुन शेतकरी रात्रीच्या अंधारात आपला जीव मुठीत घेऊन पाणी द्यायला जातात.अनेकदा हि गोष्ट शेतकऱ्यांच्या जीवावरही बेतते असाच काहीसा प्रकार अकोला जिल्ह्यात घडला होता.पहाटे ५ वाजता शेतातच एका शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागुन मृत्यू झाला होता.त्यानंतर आता शेतात गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी शेतकरी गेला होता.अचानक मोटरमध्ये बिघाड झाल्याचं पाहतांना एका शेतकऱ्याचा शॉक लागुन मृत्यू झाला.

मंगेश फाळके(वय ३२) असं या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.दरम्यान,मृतक मंगेश हे आईसह त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा.आता घरातील कर्ता पुरुष गेल्याने फळके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.तर मंगेशच्या आईने हा थरारक प्रसंग स्वत: डोळ्यांनी बघितला.

नेमकी काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार,अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील चतारी गावात मंगेश फाळके(वय ३२) हा शेतकरी आपल्या कुंटुबासह राहतो.त्यांच्याकडे २.५ एकर शेती असुन त्यामध्ये गव्हाचे पिक घेतलं आहे.दरम्यान गव्हाला पाणी द्यायचे म्हणुन मंगेश आपल्या आईसह नियमितप्रमाणे कालही दुपारी 11.30 वाजता शेतात गेले होते.

गव्हाला पाणी देण्यासाठी ते कॅनॉलजवळ गेले.तिथे पाण्याची मोटर सुरू केली.परंतु मोटर सुरू झाली नाही.मोटर नेमकी का सुरू झाली नाही? हे पाहण्यासाठी मंगेशनी मोटरची बारकाईने पाहणी केली.परंतु पाहणी करत असताना मोटर पंपमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांना विजेचा झटका बसला.यात मंगेश हे जागीचं ठार झाले.

यावेळी मंगेशची आई तिथेच उपस्थित होती.त्यांनी हा भयंकर प्रसंग डोळ्यांनी बघितला.याची माहिती त्यांनी लागलीच शेजारी असणार्या लोकांना दिली.त्यांनीही घटनास्थळावर धाव घेतली आणि विद्युत कनेक्शन बंद केलं.कॅनॉलमधुन मंगेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.याशिवाय चान्नी पोलिसही घटनास्थळी पोहचले.या प्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मंगेश करायचे कुटुंबियांचा सांभाळ
मंगेश फाळके यांच्या वडिलांचं २ वर्षांपुर्वी दुःखद निधन झालं.त्यांच्या पश्वात पत्नी, ४ बहिणी, १ मुलगा असा परिवार आहे.चारही मुलींचे लग्न झाले असुन मंगेश हा सर्वात लहान आहे.वडिलांच्या निधनानंतर घरची संपुर्ण जबाबदारी मंगेश यांच्या खांद्यावर आली.आता मंगेशच गेल्याने अख्ख्या कुटुंबावर मोठं संकट उभा राहिलं आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *