अमरावतीच्या इंजिनीअर मुलाने जेवणात विष घालुन संपुर्ण कुंटुबाला संपवल😥, धक्कादायक कारण उघडं

अमरावती : इंजिनीअर तरुणाने आपल्या शिक्षणासोबत शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवला.सुरुवातीला बक्कळ नफा कमवला.अनेकांना प्रेरित करून त्यांच्यांकडूनही पैसेही घेतले.मात्र,बाजारात सातत्याने मंदी येत गेल्याने तो निराशेत गेला आणि त्याने आत्महत्येचा पर्याय निवडला.आई-वडील आणि बहिणीसह स्वतःच्याही जेवणात विष कालवुन संपूर्ण कुटुंबच संपवलं.

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातलं हे कुटुंब होतं.ही धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.जिल्ह्यातील दर्यापूर शहरातील रविदास नगर येथील रहिवाशी दीपक थोटे यांच्या कुटुंबाची स्थिती अतिशय हालाकीची होती.त्यांच्याकडे कुठलीही शेती नव्हती.त्यांनी आपल्या मुलाचे शिक्षण दर्यापूर या ठिकाणी पुर्ण केले व मुलाला इंजीनिअर बनवले.तसेच एक मुलगी ही शिक्षण घेत होती.

मुलगा ऋषिकेश थोटे हा इंजिनीअर झाल्यानंतर त्याने शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवला सुरुवात केली.त्यामध्ये त्याला आधी नफा मिळत गेला.त्या नफ्यातुन ऋषिकेशने आपले घर हे दर्यापूर येथे बांधले आणि काही दिवसात ऋषिकेश हा शेतीसुद्धा घेणार होता.ऋषिकेशला वारंवार शेअर मार्केटमध्ये नफा दिसत होता.त्याने दर्यापुर शहरातील कित्येक लोकांपासुन पैसा घेतला आणि तो पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवला.नंतर ऋषिकेश हा आपल्या कुटुंबाला घेऊन १ वर्षापूर्वी पुण्यात राहण्यासाठी गेला.पुण्यात तो एका खासगी कंपनीमध्ये जाॅबही करत होता.

ऋषिकेशने शेअर मार्केटमध्ये लाखो रुपये गुंतवले होते,अशी माहिती समोर येत आहे.मात्र शेअर मार्केटमध्ये मंदी आल्याने ऋषिकेश हा पूर्णतः हवालदिन झाला होता.लोकांपासुन लाखो रुपये घेतल्याने पैसा आता परत कसा करणार? या चिंतेत ऋषिकेश होता.पण या संकटातुन बाहेर पडण्याऐवजी त्याने टोकाचं पाऊल उचललं.

त्याने जेवणात विष कालवलं.आपल्या आई-वडील आणि लहान बहिणीच्या जेवणातही विष कालवलं.या घटनेत थोटे कुटुंबातील चारही सदस्यांचा मृत्यू झाला.सदरच्या घटनेची माहिती दर्यापूर येथे कळली.त्यांचे जवळचे नातेवाई आणि कुटुंबात मोठा दुःखाचा डोंगर कोसळला.सर्वांवर पुण्यातच अंत्यसंस्कार करणार आले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *