अमरावतीत अल्पवयीन बहिण घरच्यांना सोडुन बाॅयफ्रेंडसोबत निघुन गेली पण रात्री ठरुन गेमचं केला

अमरावती : अल्पवयीन मुलाने बहिणीच्या प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आमला विश्वेश्वर इथं ही घटना घडली. अक्षय उर्फ गुणवंत दिलीप अमदुरे ( वय२२वर्ष रा.चांदुर रेल्वे) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

प्रेम प्रकरणातून अल्पवयीन बहिणीला घेऊन गेल्याचा राग अल्पवयीन भावाला होता. त्यामुळे बहिणीचा प्रियकर गावात येताच भावाने मित्रांना सोबत घेऊन त्याला गावाबाहेर नेले व तेथे चाकूने सपासप वार करून त्याला दुचाकीवर परत गावात आणून भरचौकात फेकून हत्या केली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय अमदुरे याने कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आमला विश्वेश्वर येथील अल्पवयीन मुलीला काही दिवसांपूर्वी सोबत नेलं होतं. पोलिसांनी घरातून निघून गेलेल्या या जोडप्याला पकडलं. मात्र युवतीने आम्ही एकमेकांवर प्रेम करत असून मी माझ्या मर्जीने गेली होती, असं पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं.

दरम्यान मुलगी अल्पवयीन असल्याने मृतक अक्षय अमदुरे याच्यावर गुन्हा देखील झाला होता. त्यानंतर गुरुवारी रात्री तो आमला विश्वेश्वर येथे गावात आला. त्यावेळी तरुणीच्या भावाने त्याला पाहिले आणि मित्रांसह त्याच्यावर हल्ला केला.

या हल्ल्यात जखमी झालेल्या अक्षयला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रक्तस्त्राव जास्त झाला असल्याने त्याला नागपुरात उपचारासाठी हलवण्यात आलं. मात्र वाटेतच तिवसा परिसरात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कुऱ्हा पोलिसांनी तीन अल्पवयीन युवकांसह सहा जणांना अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *