अमरावतीत आईनेचं मुलगी अक्षराला बोर्नविटातुन उंदराचं औषध देऊन ठार मारलं, आईनी रडत-रडत सांगितल कारण
आई आपल्या मुलासाठी कुठल्याही पातळीला जाऊन मुलांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करते. आपल्या मुलावर कुठलेही संकट येऊ नये यासाठी ती सतत प्रयत्नशील असते मात्र या विचारांना तडा देणारी एक घटना अमरावतीत समोर आलेली असून एका आईने दुधातून दिलेले विष पिणाऱ्या अकरा वर्षांच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. 19 तारखेला या मुलीचा मृत्यू झालेला असून तिला विष पाजणाऱ्या आईच्या विरोधात कुऱ्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, अक्षरा अमोल जयसिंगकार ( वय 11 राहणार अंजनसिंगी ) असे या चिमुरडीचे नाव असून तिच्या आईला पोटाचा त्रास असल्याकारणाने आपण मरून गेल्यानंतर आपल्या मुलांचे काय होणार या भीतीपोटी अक्षरा आणि तिच्या एका लहान मुलाला बोर्नविटा टाकलेल्या दुधात आईने विष कालवून दिलेले होते. त्याची कबुली आणि स्वतः देखील विष घेतल्याची कबुली अक्षरा हिची आई प्रिया अमोल जयसिंगकार ( राहणार अंजनसिंगी वय 28 ) हिने दिलेली आहे.
11 मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास अंजनसिंगी येथे ही घटना घडलेली होती. वडील कामासाठी बाहेर गेलेले असताना आपल्याला पोटाचा त्रास असह्य होत असल्या कारणाने आपल्या मृत्यूनंतर आपल्या मुलांचे काय होणार ? या भीतीपोटी आपण हे कृत्य केल्याचे कबुली प्रिया हिने दिलेली असून बोर्नविटा टाकलेल्या दुधात तिने उंदीर मारण्याचे औषध मिसळून दिलेले होते. शेजाऱ्यांच्या हातावर लक्षात आल्यानंतर त्यांनी तिघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल केले त्यात अक्षरा हिचा मृत्यू झालेला असून तिचा लहान भाऊ आणि आई यांच्यावर उपचार सुरू आहेत .