अमरावतीत सकाळी काॅलेजला गेलेली तरुणी जिवंत घरी परतलीचं नाही, बाँडीची अवस्था पाहुन आई-वडिलांना मोठा धक्का

Amravati Accident News : कॉलेजला जात असल्याचे हसत खेळत तरुणी घराबाहेर पडली. मात्र, वाटेतच तिला मृत्युने कवटाळलं. विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की टिप्परखाली आल्याने महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाला. (Latest Marathi News)

ही दुर्दैवी घटना (Amravati) सकाळी शुक्रवारी साडे अकरा वाजेच्या सुमारास हरवतखेडा ते परतवाडा मार्गावर घडली. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रतीक्षा राजेंद्र गावंडे (वय- २३ रा. हनवतखेडा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.प्रतीक्षा ही परतवाडा येथील भगवंतराव शिवाजी पाटील महाविद्यालयात एम. कॉम. ला शिकत होती. सकाळी ती नेहमीप्रमाणे दुचाकी क्रमांक एमएच २७ एटी ०५९५ ने घरून महाविद्यालयात जायला निघाली. मार्गात टिप्पर क्रमांक एमएच २७ एक्स ६८५६ ने काळ बनून तिला चिरडलं.

प्रतीक्षा ही कॉलेजला जात असताना, मुरूम घेऊन जात असलेल्या टिप्परने दिला धडक (Accident) दिली. तिचे संतुलन बिघडल्याने ती ट्रकच्या समोरील चाकात आली. तिच्या मानेवरून ट्रकचे चाके गेल्याने ती जागीच गतप्राण झाली. घडलेल्या घटनेची माहिती गावात पसरतात नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत सदर टिप्पर जाळण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत ट्रिप्पर चालक घटनास्थळ सोडून पळून गेला होता.

सदर रस्त्याला लागून असलेल्या झाडा झुडपामुळे वाहन चालकांना समोरून येणारे वाहन दिसत नसल्यामुळे हा अपघात घडला असल्याची चर्चा आहे. गावातून अरुंद असलेल्या रस्त्याने जड वाहने चोरूनलपून गौण खनिजाची वाहतूक करतात. त्यामुळे असे अपघात होत असल्याचे गावकर्‍यांचे म्हणणे आहे. परतवाडा पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल करत ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *