अमोल सराचं आनंदी कुंटुब झालं उद्वस्त, डोळ्यादेखत😥पत्नीसह लेकीचा जीव जातं होता पण काहीचं करता आलं नाही
बुलढाणा : चालती कार विहिरीत कोसळल्याने मुलगी आणि पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच या दुर्घटनत पती गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. तसेच विहिरीत पडलेल्या मायलेकीच्या रेस्क्यू दरम्यान एका 24 वर्षीय युवकाने टाकली विहिरीत उडी टाकली.
20 मिनिंटापासून युवक हा बाहेर आलाच नाही. पवन पिपळे (वय 24 वर्ष), असे उडी घातलेल्या युवकाचे नाव समोर आले आहे. या युवकाचा शोध सुरू आहे. मृत पत्नी आणि मुलीला काढण्यासाठी गेलेल्या युवक हा विहिरीत बेपत्ता झाला आहे. पत्नीला कार शिकवताना विहिरीत कार पडली. पत्नीला कार शिकवताना विहिरीत कार पडली. या दुर्घटनत पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाला आहे. तर पतीला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ही धक्कादायक घटना देऊळगाव राजा येथे घडली.
देऊळगाव राजा येथील रामनगरमध्ये राहणारे शिक्षक अमोल मुरकुट हे आपली पत्नी स्वाती मुरकुटला कार शिकवत होते. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी सिद्धी मुरकुट वर्ग पाचवा ही सुद्धा सोबत होती. दरम्यान, कार शिकवित असताना चिखली रोडवर जात असताना कार वरील ताबा सुटल्याने कार सरळ विहिरीमध्ये पडली.
यामध्ये अमोल मुरकुट खिडकीमधून कसेबसे बाहेर आले. मात्र, स्वाती मुरकुट व मुलगी सिद्धी मुरकुट यांचा मात्र पाण्यामध्ये मृत्यू झाला आहे. अमोल मुरकुटे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून स्वाती मुरकुट व सिद्धी मुरकुट यांचा मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत