अरे देवा! कोल्हापूरात दीड वर्षाची लेक झाली पोरकी, रात्री आईना अखेर घेतला जगाचा निरोप

राधानगरी : केळोशी पैकी माळवाडी येथील नवविवाहिता सविता दत्तात्रय शिंदे (वय २४ वर्ष ) हिने सासरच्या जाचाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. तीन वर्षांपूर्वी तिचे माळवाडी येथील दतात्रय विठ्ठल शिंदे या तरूणाशी लग्न झाले होते. मुलीला नाहक त्रास देऊन तिला आत्महत्तेस प्रवृत्त केल्याबद्दल तिचा पती, सासू, सासरे यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी तिच्या नातेवाईकांनी राधानगरी पोलीस ठाण्यात ठाण मांडत केली.

राधानगरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सविता शिंदे हिला पती, सासू सासऱ्याकडून सततचा जाच होत होता. तिला दीड वर्षांची लहान मुलगी आहे. जाचाला कंटाळून ती चार महिन्यांपूर्वी चक्रेश्वरवाडी गावी माहेरी आली होती. स्थानिक पंच आणि नातेवाईकांनी वाद मिटवत मुलीला सासरी पाठवलं होतं. तरीही सासरकडील लोकांनी जाच सुरु ठेवल्याने सविताने जाचाला कंटाळून मंगळवारी सकाळी विषारी औषध प्राशन केले.

तिला उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. पण उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. पण तेथेही उपचार होऊ न शकल्याने मंगळवारी रात्री तिचा मृत्यू झाला. संतप्त नातेवाईकांनी राधानगरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मुलीची कैफियत मांडत मुलीला आत्महत्येस प्रवृत्त करणारे पती, सासू सासऱ्यावर गुन्हा नोंद करून न्याय देण्याची मागणी केली.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *