अरे देवा! नगरमध्ये आई-वडिल,पती सगळ्यांदेखत रेश्मानी जीव सोडला,😥वाचुन डोळ्यात पाणी येईल

संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील वरंवडी येथिल सौ. रेश्मा नानासाहेब पोपळघट (वय – २७) या महिलेचा नेवासे तालुक्यातुन परतत असताना झालेल्या विचित्र अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असून वरंवडी येथे सोमवारी सकाळी या महिलेवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वरंवडी येथिल नानासाहेब पोपळघट व सौ. रेश्मा पोपळघट हे दापत्य कामानिमित्त पुणे येथे वास्तव्यास होते. रविवारी नेवासे तालुक्यात आप्तेष्टाचे लग्न होते. त्यामुळे हे दापत्य लग्नासाठी आले होते.

रविवारी लग्नसोहळा आटपून अँपेरिक्षाने खडका-सलाबतपूर रस्त्यावरुन येत असताना हॉटेल वैभव समोर ही अँपेरिक्षा पलटी झाली. त्यामुळे रिक्षात बसलेल्या सौ. रेश्मा या डोक्यावर पडल्यामुळे जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. तर त्याच्या समवेत असलेले पती व आई तसेच वडील याना मुक्का मार लागल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान सौ. रेश्मा यांच्या पश्चात पती, एक दिर, जाव, सासरे, आई व वडील असा मोठा परिवार असून सोमवारी सकाळी वरंवडी येथे सौ. रेश्मा पोपळचट यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह नातेवाईक व आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *