अरे बाब रे! दारुच्या नशेत मित्राशीचं केलं लग्न अन् सासरी गेल्यावर सासर्याकडं वेगळीचं मागणी

मेडक- दारु हि वाईटच असते,अनेकजण ती आनंदात पितात आणि काहीजण दुःखातही पितात.दारुच्या नशेत कोण कधी काय करेल या नेम नसतो.दारुच्या धुंदीत कधी मोठे वाद-विवाद झालेले तुम्ही नक्कीचं पाहिले असेल.पण सध्या वेगळचं एक प्रकरण समोर आले आहे.२ तरुणांनी दारुच्या नशेत एकमेकांसोबत लग्न केल्याची विचीत्र घटना समोर आली आहे.हे प्रकरण कुठं बाहेरच्या देशातील नाही तर तेलंगणा राज्यातील आहे.

हि घटना तेलंगणातील मेडक जिल्ह्यातील आहे.या ठिकाणी २ युवकांनी आधी मद्यपान केले आणि नंतर नशेच्या नशेत चक्क लग्न केले.लग्नाची बातमी कळताचं या दोन तरुणांच्या कुटुंबीयांना तर आश्चर्याचा धक्का बसला.

हि घटना १ मार्चची आहे.कोलचाराम परिसरातील दामपलाकूंटा येथील एका दारूच्या दुकानात दोन्ही मित्रांची भेट झाली.दोघांनी फुल नशेत होते आणि नशेच्या अवस्थेत एकमेकांशी लग्न केले.रिपोर्टनुसार,यातील एक युवक संगारेडी जिल्ह्यातील जोगीपेट येथील असुन एक चिलपचेडमधील चांदुर येथील आहे.या दोन्ही तरुणांचे वय २१ आणि २२ वर्षे असल्याचं कळतयं.

लग्नानंतर दुसऱ्या दिवशी हा युवक चांदुर गावातील तरुणाच्या घरी गेला आणि त्याने लग्न करून तुमच्यासोबत राहण्यास आलो असल्याचे त्याच्या कुंटुबियांना सांगितले.हे ऐकून नवरदेव तरुणाच्या आई-वडिलं हैराणचं झाले.त्यांनी त्याला तेथुन निघून जाण्यास सांगितले,मात्र तरुण काही ऐकायला तैयार नव्हता.१ लाख रुपये द्या नाहीतक इथुन हालणार नाही असे त्यांनी सांगितले.चांदुर रहिवासी असलेल्या आई-वडिलांनी त्याची अट पुर्ण केली नाही तेव्हा तरुणाने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

यानंतर प्रकरण गुंतागुंतीचे होत असल्याचे पाहून पोलिसांनी आणि गावातील ज्येष्ठांनी दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांना बोलावून चर्चा केली. अखेर चांदूर रहिवासी कुटुंबीयांनी जोगीपेठ येथील तरुणाला १० हजार रुपये दिले, त्यानंतर तरुणाने आपली तक्रार मागे घेतली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *