अरे बाब रे! प्रियकराच्या बाॅडीचे सपासप ८ तुकडे केले ,गोणीत भरुन नाल्यात फेकले ; कारण ऐकुण BP वाढलं
देशात काही दिवसांपासून धर्मांध प्रवृत्तींनी धुमाकूळ घालायला सुरुवात केलेली असून असाच एक क्रूरतेची मर्यादा ओलांडणारा प्रकार हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात समोर आलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी या प्रकरणात एका तरुणाची हत्या केली आणि त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे सुमारे आठ तुकडे करून त्याचा मृतदेह नंतर नाल्यात फेकून दिलेला होता.
6 जून पासून हा तरुण बेपत्ता झालेला होता . पोलिसांनी मृतदेहात ताब्यात घेतला आणि त्यानंतर शवविच्छेदन करून नातेवाईकांकडे अंत्यसंस्कारासाठी देण्यात आला.उपलब्ध माहितीनुसार, मनोहर असे 21 वर्षे मयत तरुणाचे नाव असून त्याचे बांदल गावात एका मुस्लिम तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मुलीच्या घरच्यांना मनोहर हा पसंत नसल्याकारणाने मुलीच्या भावांनी ही हत्या केल्याचा आरोप आहे.
सदर आरोपींनी क्रूरतेची मर्यादा ओलांडत अक्षरशः मनोहरच्या मृतदेहाचे आठ तुकडे केले आणि त्यानंतर हे तुकडे गोणीत बांधले आणि ती गोणी नदीत नाल्यात फेकून दिली. नऊ जून रोजी ही घटना उघडकीला आलेली असून नाल्याजवळून काही लोक जात असताना त्यांना विचित्र वास आल्याने त्यांनी याप्रकरणी पोलिसांना माहिती कळवली यावेळी एका गोणीमध्ये हे अवयव आढळून आलेले आहेत.
चंपा एसपी अभिषेक यादव यांनी याप्रकरणी माहिती देताना एका 21 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आलेली असून गेल्या काही दिवसांपासून हा तरुण बेपत्ता झालेला होता . त्याचा मृतदेह नाल्यात आढळून आलेला असून त्याची हत्या करून मृतदेहाचे तुकडे करण्यात आलेले आहेत अशी माहिती देत आत्तापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आलेली असून आम्ही प्रकरणाचा तपास करत आहोत असे सांगण्यात आलेले आहे.