अर्णवचा आईसोबतचा सेल्फी ठरला शेवटचा, विसर्जनादरम्यान मुलगा मरण पावला पण लक्षातचं आलं नाही

पुणे : पिंपरी- चिंचवडसह महाराष्ट्रात (Pune Crime News) गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडलं. गणपती बाप्पांना पाणवलेल्या डोळ्यांनी गणेश भक्तांनी निरोप दिला. असं असताना पिंपरी- चिंचवडमधील (Pune Ganeshotsav 2023)मोशी येथे गणपती विसर्जन सुरू असताना चार वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अर्णव आशिष पाटील या चार वर्षीय मुलाचं नाव आहे.

मोशीतील मंत्रा सोसायटी या ठिकाणी काल सायंकाळी घटना घडली. अर्णव हा सोसायटीमधील गणपती विसर्जन टाकीच्या शेजारी उभा राहून बघत होता. लेझीमच्या ठेक्यावर सोसायटीतील सदस्य नाचत असताना अचानक अर्णव हा टाकीत पडला हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. यासंबंधीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. अर्णव सोबतचा सेल्फी देखील पुढे आला असून तो शेवटचा ठरला.

काल पुण्यात सगळीकडे गणेशोत्सवाची धामधुम सुरु होती. अनेकांनी ढोल ताशावर ठेका धरला होता. बाप्पाला निरोप देण्यासाठी सगळेच एकत्र आले होते. रस्त्यांवर जल्लोष दिसत होता. याच जल्लोषात पाटील यांचं कुटुंबदेखील बाप्पाला निरोप देत होतं. त्यावेळी मुलगाही नाचत होता आणि टाकीत पडला आणि मुलानंच निरोप घेतला.

डॉल्बीच्या आवाजानं धडधड वाढली अन् थेट खाली कोसळला…
हिंजवडी येथील एका 23 वर्षीय तरुणाचा गणपती विसर्जन मिरवणुकीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. योगेश अभिमन्यू साखरे असे मृताचे नाव असून तो हिंजवडी येथील रहिवासी आहे. तो हनुमान तालीम मित्र मंडळाशी संबंधित होता.

बुधवारी रात्री नऊच्या सुमारास तो हिंजवडीजवळ मिरवणुकीत सहभागी झाला होता. त्यावेळी त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्याने औषध खरेदी करण्यासाठी मेडिकल स्टोअरमध्ये धाव घेतली तिथेच तो कोसळला. ही परिस्थीती पाहू स्थानिकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आणि गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्यांना औंध रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं.

अति उत्साह अन् आवाज जीवावर बेतले…
राज्यात जल्लोषात गणेशोत्सव 10 दिवस पार पडला मात्र शेवटच्या दिवशी या गणेशोत्सवाला आवाजामुळे आणि अति उत्साही कार्यकर्त्यांमुळे गालबोट लागलं. सध्या सगळ्या मंडळांमध्ये आवाजात आणि डॉल्बी सिस्टिमवरुन स्पर्धा दिसून येते. कोणाचा आवाज मोठा यावरुन अनेकदा वाद बघायला मिळतो. मात्र हाच आवाज अनेकांचा जीव घेत असल्याचं मागील काही वर्षांत घडलेल्या घटनांमधून समोर आलं आहे.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *