अवघ्या १ महिन्यापुर्वी लग्न अन् आज संपल जीवन, पालघरमध्ये टायरमुळं तरुणाचा मृत्यू

पालघर / मोहम्मद हुसैन : भरधाव कारचे टायर फुटल्याने पालघर बोईसर रोडवर कारचा भीषण अपघात झाल्याची घटना पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात कारमधील 23 वर्षीय नवविवाहित तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

कैफ इस्रार खान असं अपघातात मृत्यू झालेल्या 23 वर्षीय तरुणाचं नाव आहे. अपघातात कारचा चक्काचूर झाला. यात कारचालक गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी पालघरमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. पालघर बोईसर रोडवर उमरोळी गावात ही घटना घडली.

हळदीला आलेल्या नातेवाईकांना सोडायला गेला होता
मयत तरुणाचे महिनाभरापूर्वीच लग्न झाले होते. काल त्याच्या घरी चुलत भाऊ अल्तमस जुनेद खान याच्या हळदीचा कार्यक्रम होता. हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर नातेवाईकांना घरी सोडण्यासाठी पालघर येथे कारने गेला होता. नातेवाईकांना सोडून बोईसर येथे घरी परतत असताना उमरोळी गावाजवळ कारचे टायर फुटले. कार एका मोठ्या झाडावर आदळली.

अपघातात तरुणाचा मृत्यू, कारचालक जखमी
अपघातात कारमधील तरुणासह चालकही गंभीर जखमी झाला. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र काही वेळातच कैफचा मृत्यू झाला. तर जखमी कार चालकावर सध्या पालघरमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत कैफचं महिनाभरापूर्वीच लग्न झालं होतं. कैफच्या मृत्यूने सध्या परिसरात शोकाकुल वातावरण असून, कुटुंबातच लग्न असताना कैफच्या झालेल्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *