अशी बायको😥नको रे देवा! ३० वर्षीय पत्नीमुळं नाशिकच्या राकेशनी😥पुलावरुन उडी मारुन मरणाला जवळं केलं
नाशिक : बायको आणि तिच्या प्रियकाराच्या मानसिक त्रासाला कंटाळुन पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरात घडली आहे.या घटनेने संपुर्ण नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.राकेश उर्फ राधेशाम टिकमदास वैष्णव-बैरागी असे आत्महत्या केलेल्या ३४ वर्षीय व्यक्तीचे नाव आहे.
या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात राकेश यांची ३० वर्षीय पत्नी आणि तिचा प्रियकर रिझवान मन्सुरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्यात राकेश यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी दाखल केली होती.त्यानुसार पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली असता गंगापुर पोलिसांना बापू पुल परिसरात एक अज्ञात इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळल्याचं समजलं.
बोटिंगला आलेल्या अंबादास तांबे यांनी हा मृतदेह पाहिला होता.त्यानंतर त्यांनी गंगापुर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती कळवली होती.सदर मृतदेहाबाबत चौकशी केली असता अंबड पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल असलेल्या राकेश याचाच हा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर राकेश यांच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी खूनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पोलिसांकडे केली होती.त्यावेळी गंगापुर पोलिसांनी तपासात काही आढळुन आल्यास गुन्हा दाखल करू अशी माहिती कुंटुबियांना दिली होती.दरम्यान,राकेश यांच्या मृत्यू बाबत पोलिसांकडून तपास चालु असताना पोलिसांना तपासात एक धक्कादायक बाब उघडकीस आली.बायको आणि तिचा प्रियकर राकेश यांना मानसिक त्रास देत असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले.
पत्नीचे अनैतिक संबंध असल्याने राकेश मानसिक तणावात गेला होता.पत्नी आणि तिचा प्रियकर सतत त्रास देत असल्याने पती राकेशने जीवन संपवल.या प्रकरणी गंगापुर पोलिसांनी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या पत्नी आणि बाॅयफ्रेंड यांच्यावर गुन्हा दाखल केला असुन पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे.