|

अहमदनगरमध्ये बहिणीनेचं लहान बहिणीला ओढणीने गळा आवळुन ठार केलं, धक्कादायक कारणाचा खुलासा

अहमदनगर – प्रेम प्रकारणाबद्दल घरच्यांना माहिती दिली या रागातुन सख्या मोठ्या बहिणीने लहान बहिणीची निर्घुणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे.पोलिसांनी आरोपी बहिणीला अटक केलं आहे.

अहमदनगरमध्ये कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात ३० सप्टेंबर रोजी १६ वर्षीय हर्षदा बानकर या युवतीचा मृतदेह तिच्याच घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळुन आला होता.प्रथमदर्शनी हि आत्महत्या असल्याचे भासत होते.मात्र हर्षदा हिची आत्महत्या नसुन हत्या झाल्याचे आणि हि हत्या तिच्याच सख्या मोठ्या बहिणीने केल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस तपासातुन समोर आला आहे.

मयत हर्षदाची १९ वर्षीय मोठी बहीण सृष्टी बानकर हिचे श्रीरामपुरमधील आकाश कांगुणे नावाच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते.याबद्दल हर्षदा हिने घरच्यांना सांगितल्यानंतर घरच्यांनी सृष्टीला समज दिली होती तसेच काही दिवस तिचे कॉलेजला जाणेही बंद केले.त्यामुळे सृष्टीच्या मनात हर्षदाबद्दल रागाची भावना निर्माण झाली होती.

त्यानंतर सृष्टी हि बाॅयफ्रेंडसोबत पळून जाण्याच्या तयारीत असल्याने हर्षदा हिने तिला तसे कृत्य विरोध केला.प्रेमात आंधळी झालेल्या सृष्टीने मागचा पुढचा कसलाही विचार न करता ओढणीच्या सहाय्याने गळा आवळुन हर्षदाची हत्या केली.हत्येनंतर आरोपी सृष्टी हि आकाशसोबत ठरल्याप्रमाणे पळुन गेली.

कोपरगाव पोलिसांनी घटनेचा सखोल तपास करत सृष्टी आणि तिचा बाॅयफ्रेंड आकाश कांगुणे यांना श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथुन ताब्यात घेतले.शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होताच आईच्या फिर्यादीवरून आरोपी सृष्टीवर कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.मात्र आंधळ्या प्रेमापोटी बहिणीनेचं बहिणीची हत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.दरम्यान या हत्या प्रकरणात प्रियकर आकाश तसेच अन्य कोणी सहभागी आहेत का नाही? याबाबतचा अधिक तपास कोपरगाव शहर पोलीस आता करत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *