‘आईचे सगळे स्वप्न पुर्ण करणारं’,असं म्हणणारा आकाश आईसह गेला जग सोडुन; रत्नागिरीतील घटना

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहराजवळील वळणे औद्योगिक वसाहतीजवळ (MIDC)एसटी बस आणि दोन मोटारसायकलची समोरासमोर जोरदा धडक झाली. या भीषण अपघातात मायलेकाचा जागेवरच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी आहेत.मीनाक्षी मंगेश बोरजे (वय-45), आकाश मंगेश बोरजे (वय-21) या मायलेकाचा मृत्यू झाला तर विलास गोरीवले, निलेश गोरीवले हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

सध्या रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. दापोली परिसरातही संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावर हा अपघात घडला. या अपघातात आई व मुलगा जागीच मृत्यूमुखी झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. दापोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.

दुसरीकडे, भरधाव ट्रकनं एका पुरोहीताला चिरडलं असून त्याचाही जागेवरच मृत्यू झाला आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा- मनोर मार्गावरील पालीजवळ हा भीषण अपघात झाला आहे. अजय कापसे असं मृत व्यक्तीचं नाव आहे.पालघरमधील वाडा-मनोर मार्गावरील पाली गावाजवळ दुचाकीवर वाड्याच्या दिशेने चाललेल्या अजय कापसे यांनी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने चिरडले. अपघातात पुरोहित कापसे यांचा जागीच मृत्यू झाला.

वाडा तालुक्यातील पोशेरी येथील आयडियल कॉलेजमधील मंदिरात पूजेसाठी गेलेले कापसे वाड्याच्या दिशेने परतत होते. त्यावेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. ते ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर ट्रकचालक ट्रक घेऊन पसार झाला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *