आई-अण्णा माफ करा, मी कुठल्या मुलीसाठी नाही, तर… २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या; पत्र वाचुन अख्खं गाव रडलं

नांदेड : आई आणि अण्णा मला माफ करा… मी माझ्या अनसक्सेस आयुष्याला कंटाळलो आहे… माझ्या समोर जगण्याचं कोणतेच ध्येय राहिलं नाहीये… मी कोणत्या मुलीसाठी नाही, तर माझ्या अनसक्सेस लाईफला कंटाळून टोकाचं पाऊल उचलत आहे, अशी भावनिक चिठ्ठी लिहित एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. नांदेड जिल्हातील लोहा शहरात सोमवारी ही घटना उघडकीस आली आहे. प्रशांत पंढरी ढवळे असं या तरुणाचं नाव आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

२३ वर्षीय प्रशांत ढवळे हा आपल्या कुटुंबियांच्या सोबत लोहा शहरातील इंदिरा नगर मध्ये राहत होता. एका खाजगी रुग्णालयात तो काम करायचा. बीएससीनंतर तो डीएमएलटीचं शिक्षण देखील घेत होता. काहीतरी करून दाखवायचं त्याचं स्वप्न होतं. त्यामुळे त्याने सातत्याने स्पर्धा परीक्षा दिल्या. पोलीस भरतीतही तो उतरला. मात्र नेहमी त्याला अपयश मिळत असल्याने तो हतलब झाला होता.

रविवारी मध्यरात्री तो आपल्या रूममध्ये गेला. आतून त्याने कडी लावली आणि त्यानंतर लोखंडी रॉडला दोरी बांधून त्याने गळफास घेतला. सकाळी उशिरापर्यंत दरवाजा बंद असल्याने कुटुंबियांनी दरवाजा ठोठावला. मात्र काही प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर प्रशांतचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

आत्महत्या करण्यापूर्वी प्रशांतने चिठ्ठी देखील लिहिली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोहा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करुन आकस्मिक मृत्यूची नोंद केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

काय लिहिलं होतं चिठ्ठीत?
अण्णा आणि आई माफ करा मला, मी कायमचं तुम्हाला सोडून जायचा निर्णय घेतला आहे. हे टोकाचं पाऊल कोणत्या मुलीसाठी किंवा तिच्या प्रेमासाठी उचलत नाही. मी कोणत्याही मुलीवर प्रेम करत नाही. एवढा मोठा निर्णय घेण्याचं कारण एकच आहे, की मी माझ्या अनसक्सेस लाईफला कंटाळलो आहे. मला जगण्याचं कोणतंच कारण समोर दिसत नाही. माझ्या समोर कोणतेच ध्येय उरले नाही, तसेच कुठल्याही प्रकारची मेहनत घेण्याची इच्छा नाही. अण्णा इथून पुढे तरी आईला त्रास देऊ नका. माझी आखरी इच्छा समजा. अशा अनेक भावना त्याने चिठ्ठीत लिहून आपलं आयुष्य संपवलं आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *