आई, उठ ना! माझ्यावर रागावलीस का? त्याला वाटलं आई झोपलीय; पण तिना २ दिवसांपूर्वीच प्राण सोडले होते

बंगळुरू: कर्नाटकची राजधानी बंगळुरूत एक धक्कादायक घटना घडली आहे.एका महिलेचा २ दिवसांपुर्वी मृत्यू झाला.मात्र तिच्या लेकराला याची कल्पनाच नव्हती.तो ३ दिवस आईच्या मृतदेहाशेजारी झोपला होता.आपली आई आपल्यावर नाराज असेल.ती चिडली आहे आणि त्यामुळे आपल्याशी बोलत नाही,असा विचार करून लेकरु आईला उठवत होता.

बंगळुरूच्या आरटी नगरमध्ये हि घटना घडली आहे.या परिसरात वास्तव्यास असलेला ११ वर्षांचा मुलगा त्याच्या आईच्या मृतदेहासोबत २ दिवस झोपला होता.आई या जगात नाही याची पुसटशी कल्पना मुलाला नव्हती.आई झोपली आहे असा विचार तो करत होता.आई रागावली आहे.त्यामुळे ती बोलत नाही,असं मुलाला वाटत ३ दिवस वाटत होतं.

मिळालेल्या माहितीनुसार,४४ वर्षांच्या अन्नम्मा यांचा २६ फेब्रुवारीला कमी रक्तदाबामुळे मृत्यू झाला होता.त्यांचा मृत्यू कदाचित झोपेत झाला असावा.त्यामुळे लेकराला आई झोपेतच असावी असं वाटत असावं.अन्नम्माच्या पतीचा १ वर्षपूर्वी किडनी फेल झाल्यानं मृत्यू झाला.घरात फक्त आई आणि मुलगा राहायचे.आईच्या मृत्यूनंतर मुलगा खेळायला बाहेर जायचा.मित्रांसोबत खेळुन तो पुन्हा घरी यायचा.जेवणाची वेळ झाल्यावर तो मित्रांच्या घरी जायचा आणि तिथेच जेवण करायचा.२ दिवस मुलाचा हाच दिनक्रम होता.

आई २ दिवसांपासुन उठलेली नाही.ती माझ्यासोबत बोलतही नाही,असं २८ फेब्रुवारीला मुलानं वडिलांच्या मित्राला सांगितलं.त्याचं बोलणं ऐकुन वडिलांच्या मित्राला मोठा धक्काच बसला.त्यांनी लगेच अन्नम्मा यांचं घर गाठलं आणि घरात पोहचताचं अन्नम्मा यांचं निधन झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं.याची माहिती आरटी नगर पोलीसांना कळवली.त्यानंतर पोलीसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *