‘आई ये गं पटकन’ ,बाप्पा घेऊन दारी पोहोचले, स्वागताला आईला हाक मारतानांच मुलाचा दुर्देवी मृत्यू

कोल्हापूर : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईतून सुट्टी घेऊन गावी आलेल्या गणेशभक्ताचा बाप्पाचे स्वागत करताना दारात पाय घसरून डोक्यावर पडल्याने करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) आजरा तालुक्यात बोलकेवाडी घडली. सचिन शिवाजी सुतार (वय 38) असे दुर्दैवी गणेशभक्ताचे नाव आहे. दोन्ही पाय घसरून डोक्यावर पडल्याने गंभीर इजा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

सचिन सुतार गणेश उत्सवासाठी मुंबई येथून गावी दोन दिवसापूर्वी आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी धांदल सुरु असताना अशा पद्धतीने सचिन यांच्यावर मृत्यू ओढवल्याने बोलकेवाडी गावात सन्नाटा पसरला. कर्ता पुरुष गेल्याने सुतार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

नेमका प्रसंग काय घडला?
सचिन मुंबईत खासगी कंपनीत नोकरीस होते. पत्नी आणि मुलाला मुंबईत ठेवून ते गणेशोत्सवासाठी सोमवारी गावी आले होते. गणरायाच्या स्वागतासाठी घरी जय्यत केली होती. मंगळावी बाप्पांची मूर्ती आणण्यासाठी ते मित्रासोबत गेले होते. त्यांचा गणपती मित्र घेऊन आल्यानंतर दारात पोहोचले. गणपती स्वागत करून घरात घेण्यासाठी ते आईला हाक मारत धावत घरी गेले. त्यावेळीच त्यांचा पाय फरशीवरून घसरल्याने ते जोरात डोक्यावर पडले.

यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने आजऱ्यातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. दोन दिवसांनी मुंबईला परत येतो, असे सांगून गावी आलेल्या सचिन यांच्या दुर्दैवी मृत्यूने कुटुंबाला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.

सापावर पाय पडल्याची भीती, चिमुरड्याचा घाबरुन ताप आल्याने अंत
दरम्यान दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील (Kolhapur News) करवीर तालुक्यातील वाकरेत शाळेतून घरी येत असताना सापावर पाय पडल्याच्या भीतीने आजारी पडून ताप मेंदूपर्यंत गेल्याने चिमुरड्याचा दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली.

अर्णव नवनाथ चौगले (वय 8 वर्षे) असे त्या चिमुरड्या मुलाचे नाव आहे. तो इंग्रजी माध्यमात दुसरीच्या वर्गात शिकत होता. केवळ सापावर पाय पडल्याच्या भीतीने लहान लेकराचा अशा पद्धतीने शेवट झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी (17 सप्टेंबर) सायंकाळी ही घटना घडली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *