आई-वडिलांच्या वादामुळं तडफडुन गेला ५ लेकरांचा जीव, ऐवढा निर्दयीपणा येतो कुठुन

जयपूर: राजस्थानच्या जालोरमध्ये जोडप्यानं त्यांच्या पाच मुलांसह आत्महत्या केली. नर्मदा कालव्यात उड्या घेऊन सात जणांनी आयुष्य संपवलं. यापैकी सहा जणांचे हात आपापसात बांधलेले होके. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. पती पत्नीच्या सततच्या वादातून सामूहिक आत्महत्येचा प्रकार घडल्याचं आतापर्यंतच्या तपासातून समोर आलं आहे.

गलिफामध्ये वास्तव्यास असलेल्या शंकराराम (४१), त्यांची पत्नी बादली (३१), मुलगी रमीला (११), मुलगा विक्रम (१०), मुलगी संगीता (८), मुलगी कमला (७) आणि मुलगा हितेश (४) यांनी कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सिद्धेश्वरमधील नर्मदा कालव्यात सातही जणांचे मृतदेह सापडले. एका मुलाला सोडून इतर सहा जणांचे मृतदेह आपापसात बांधलेले होते. या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली.

आत्महत्या करेपर्यंत शंकररामच्या मनात मुलांबद्दल प्रेम, जिव्हाळा होतं. आयुष्याचा शेवट करण्याच्या अर्धा तासापूर्वी त्यानं मुलांना आईस्क्रीम आणि बिस्किटं खायला घेऊन दिली. एखादे वडील आपल्याच लेकरांचा जीव कसा काय घेऊ शकतात, असा प्रश्न या घटनेमुळे सगळ्यांना पडला आहे. शंकराराम यांच्या भावानं शेजारीच राहणाऱ्या एका तरुणाविरोधात पोलीस तक्रार नोंदवली आहे. चेलाराम असं त्या तरुणाचं नाव आहे. चेलाराममुळेच शंकरारामनं कुटुंबासह आत्महत्या केल्याचा दावा त्यांनी केला.

सुरुवातीला शंकराराम आणि बादली यांचे संबंध उत्तम होते. कुटुंब आनंदात होतं. मात्र हळूहळू दोघांमध्ये वाद होऊ लागले. शंकरारामला पत्नीच्या चारित्र्यावर शंका आली. शेजारी राहणाऱ्या तरुणावर त्याला संशय होता. संशय वाढल्यानं त्यानं एक दिवस पत्नीच्या मोबाईलवर कॉल रेकॉर्डिंग सुरू केली. याची माहिती पत्नीला नव्हती. संधी मिळताच शंकरारामनं रेकॉर्डिंग ऐकली आणि स्वत:च्या मोबाईलमध्ये घेतली.

पत्नी शेजारच्या तरुणासोबत संवाद साधत असल्याचं शंकरारामच्या लक्षात आलं. त्यानं पत्नीला समजावलं. ही गोष्ट त्यानं स्वत:च्या आईलाही सांगितली. मात्र तरीही शंकरारामच्या पत्नीचा तरुणासोबतचा संवाद सुरू होता. पत्नीचे तरुणासोबत अवैध संबंध असल्याचा संशय शंकरारामला होता. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू होते. यावेळी समजावूनही प्रकरण मिटलं नाही.

दुसऱ्या दिवशी शंकराराम आत्महत्या करण्यासाठी निघाला. त्याच्या पाठोपाठ पत्नीही बाहेर पडली. तिनं मुलांनाही सोबत घेतलं. शंकरारामनं काही अंतरावर राहत असलेल्या आईची भेट घेतली. पत्नीचा प्रियकर धमकावत असल्याचं त्यानं आईला सांगितलं. शंकराराम आणि त्यांच्या आईची ही शेवटची भेट ठरली. यानंतर थेट शंकराराम आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या मृत्यूची बातमी आली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *