‘आई वाचवं गं मला, मी इकडेय’, चिमुरड्याचा आक्रोश पण शेवटी तडफडुन मृत्यू, नाशिकमध्ये खळबळ
नाशिक: तुमच्या घरी लहान मुलं असल्यास ही बातमी नक्की वाचा.कारण हल्ली धावपळीचं आयुष्य जगताना आपल्या लेकरांकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक अनुचित प्रकार घडत आहेत.काही दिवसांपुर्वी गंगापूर नाका परिसरातील अपार्टमेंटमध्ये अंगावर पाणी सांडल्याने अवघ्या 10 महिन्याच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली होती.
अशीच एक घटना चांदवड शहरातुन समोर आली आहे.सायंकाळच्या सुमारास घराबाहेर खेळत असलेल्या ४ वर्षीय चिमुरड्याचा पाण्याच्या हौदात पडून मृत्यू झाला आहे.हार्दिक गणेश पारवे असे मृताचे नाव आहे.
चांदवड शहरातील रोहिदासनगरमध्ये राहणारा हार्दिक पारवे हा घराच्या परिसरात सायंकाळच्या सुमारास खेळत होता.येथील जुन्या पोलिस चाळीच्या मागच्या बाजुला असलेल्या पाण्याच्या हौदात तो पडला.परंतु त्यावेळी कोणाचाही हे लक्षात आले नाही.हार्दिक कुठेच दिसत नसल्याने घरच्यांनी त्याचा शोध घेतला.
मात्र तो कुठेही सापडला नाही.रात्री ८च्या सुमारास पाण्याच्या हौदात पाहिले,असता हार्दिक पाण्यात आढळला.त्याला तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासुन मृत घोषित केले.
सायंकाळी घरातील कुटुंब आपल्या कामात व्यस्त होते.अशातच बराच वेळ झाला तरी हार्दिक घरी आला नव्हता.शिवाय अंधारही पडु लागला होता.त्यामुळे घरच्यांनी शोधाशोध सुरु केली.मात्र तास-दीड तास होऊनही हार्दिक आढळुन आला नाही.शेवटी मागील बाजुसं असलेल्या हौदात हार्दिकचा मृतदेह सापडला अन् सगळ्यानांच धक्का बसला.