आजी नव्हे, ही तर माझी बायको! मुलाच्या तोंडुन हे काय निघालं; ऐकून संपूर्ण कुंटुब महिनाभर गोंधळलं अन्…
लखनऊ: उत्तर प्रदेशच्या मैनपुरीमध्ये पुनर्जन्माचा चक्रावून टाकणारा प्रकार समोर आला आहे. या घटनेची सुरुवात ९ जानेवारी २०१५ पासून होते. रतनपूरमध्ये राहणाऱ्या मनोज मिश्रा नावाची व्यक्ती त्याच्या शेतात सिंचनाचं काम करत होता. त्यावेळी त्याला एका सापानं दंश केला. त्यानंतर त्यांची दृष्टी गेली. कुटुंबियांनी त्यांना रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं.
मनोज मिश्रा यांच्या निधनावेळी त्यांची मुलगी गर्भवती होती. मनोज यांच्या मृत्यूनंतर २० दिवसांनी त्यांची मुलगी रंजनानं बाळाला जन्म दिला. तिला पुत्ररत्न प्राप्त झालं. त्याचं नाव आर्यन ठेवण्यात आलं. ४ वर्षांनंतर आर्यननं रतनपूर गावचं नाव घेण्यास सुरुवात केली. त्यानं त्याची संपूर्ण कहाणी सांगितली.
तू माझी मुलगी आहेस, आई नाही, असं आर्यन त्याच्या आईला (रंजनाला) म्हणाला. आठ वर्षांचा असताना असताना तो आजीच्या घरी गेला. त्यानं आजीला नावानं हाक मारली. तू माझी पत्नी आहेस म्हणत त्यानं माझी मुलं कुठे आहेत, अशी विचारणा केली. दोन्ही मामांना पाहून तो हमसून हमसून रडू लागला. पुनर्जन्माची कहाणी ऐकून संपूर्ण कुटुंबाला आश्चर्याचा धक्काच बसला.
मनोज मिश्रा यांच्या बँक खात्यात किती पैसे होते, त्याची आकडेवारीच आर्यननं सांगितली. यासोबतच त्यानं मनोज यांच्याशी संबंधित अनेक किस्से कुटुंबियांना सांगितले. ‘आर्यन चार वर्षांचा झाल्यावर तो मला नावानं हाक मारु लागला. त्यावेळी आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं. तो आठ वर्षांचा झाल्यावर आम्ही त्याला आजोळी नेलं. त्याला आजीच्या पाया पडायला सांगितलं. मात्र त्यानं नमस्कार करण्यास नकार दिला. ती माझी आजी नाही, पत्नी आहे असं आर्यन म्हणाला. ते पाहून आम्हा सगळ्यांनाच धक्का बसला,’ असं रंजना यांनी सांगितलं.