आजोबांनी शिट्टी वाजवली, टोपीही वाकडी केली; गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात आजोबाचा राडा

नाशिक : नाशिक जिल्ह्यात प्रथमच महाराष्ट्राची प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.नाशिकच्या निफाड तालुक्यात लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे पोस्टर देखील निफाड शहरात लागले होते.या लावणी महोत्सवाला गौतमीच्या फॅन्सनी अक्षरशः तिकीट खरेदी करत मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.

निफाडमध्ये गौतमी पाटीलच्या नृत्याला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी तरुणांसह एका लावणीप्रेमी आजोबांनी देखील सर्वांचे लक्ष वेधुन घेतले होते.गौतमी पाटीलचा डान्स सुरू होताच आजोबांनी शिट्टी वाजवत टोपी वाकडी केली.आजोबांनी शिट्टी वाजवताच यावेळी लोकांनीही शिट्ट्या आणि टाळ्यांनी गौतमीच्या डान्सला दाद दिली.

बदनामीचं विष पचवुन पुन्हा स्टेजवर…
गौतमी पाटील हिचा काही दिवसांपुर्वी काही विकृतांनी एक अश्लील video व्हायरल केला होता.हा video व्हायरल झाल्यानंतर सोशलमिडीयावर तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या.व्हिडीओच्या माध्यमातुन बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतरही गौतमी आता परत एकदा आपली नृत्यकला सादर करत सर्वांसमोर आली आहे.

याबाबत मिडीया वाल्यांनी प्रतिक्रिया विचारली असता गौतमी पाटील म्हणाली की,’video व्हायरल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई सुरू आहे.याबाबत मी पोलिसांकडे काही मागणी करणार नाही.माझं पोलिसांसोबत बोलणं सुरू आहे.सोबतचं महिला आयोगाने माझ्या प्रकरणाची दखल घेतल्याने बरं वाटलं.महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणक या माझ्या पाठीशी आहेत.त्या विकृतांवर ताबडतोब कारवाई करा,अशा सुचना चाकणकरांनी केल्या आहेत,’असं नाशिकमध्ये मिडीयाशी बोलतांना गौतमी म्हणाली

दरम्यान,यावेळी आपल्या कार्यक्रमात अनेक लोकांकडुन हुल्लडबाजी केली जाते,त्यांना काय सांगाल,असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर गौतमीने म्हणाली कि,मला त्या बाबतीत काहीही बोलायचं नाही.माझी तशी सध्या काय मनस्थिती नाही.मला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे,असं गौतमी म्हणाली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *