आटपाडीत राहुलच्या ताईना शेतातल्या विहिरीत उडी घेऊन जगाचा निरोप घेतला
आटपाडी : पतीचे दुसऱ्या महीले सोबत असलेले अनैतिक संबंध व मुंबई येथे घेतलेल्या फ्लॅटचे पैसे देण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये घेऊन, म्हणून विवाहितेचा छळ केल्याच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आटपाडी दिघंची येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, दिघंची येथील रुपाली हिचा विवाह अक्षय प्रकाश सस्ते सध्या रा. पडळेगाव, डोंबिवली पूर्व मुंबई, मुळगाव काळेवाडी ता. आटपाडी याच्याशी झाला होता.परंत रुपाली हिचा पती अक्षय याचे दुसऱ्या महिलेशी असलेले अनैतिक सबंध असल्याने व मुंबई येथे घेतलेल्या फ्लॅटचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये असे वारंवार म्हणून सतत तिचा छळ आरोपी अक्षय प्रकाश सस्ते, सविता प्रकाश सस्ते, प्रकाश पांडुरंग सस्ते हे करीत होते.
त्यांच्या या त्रासाला कंटाळून रुपाली हिने दिनांक १ रोजी दिघंची येथील शेतात आत्महत्या केली. याबाबतची फिर्याद आटपाडी पोलीस ठाणे येथे रुपाली हिचा भाऊ राहुल चंद्रकांत मोरे यांनी दिली असून सदर घटनेचाअधिक तपास उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत.