आधी डंपरची धकड नंतर ट्रॅंकरने चिरडलं; डोळ्यादेखत पाहिला पत्नी शिवानीचा मृत्यू, थरारक CCTV फुटेज समोर

पुणे : मागील काही दिवसांपासून पुण्यात अपघाताचं सत्र सुरुच आहे. या अपघातात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. असाच एक अपघात पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील किरकिटवाडी फाट्याजवळ झाला. भरधाव डंपरने ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला धडक दिली. त्यानंतर दुचाकीवरील नवविवाहित तरुणीचा समोरुन येणाऱ्या टँकरखाली पडून जागीच मृत्यू झाला. अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

शिवानी शैलेश पाटील असे या अपघातात मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. अंगावर शहारे आणणारा हा अपघात घडला आहे. शिवानी हिचा काही दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. ती आपल्या पतीसोबत गाडीवरुन कामाला जात होती. किरकटवाडी फाट्याजवळील रामेश्वर पतसंस्थेच्या समोर वाहनांची वर्दळ असताना मागून भरधाव वेगात आलेल्या अवजड डंपरने दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत शिवानी आणि तिचा पती दोघेही रस्त्यावर पडले.

आधी डंपरची धकड नंतर ट्रॅंकरने चिरडलं…
या अपघातात शिवानी आणि तिचा पती दोघेही खाली पडले मात्र भरधाव पाण्याचा ट्रॅंकरचं चाक शिवानीच्या डोक्यावरुन गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर डंपर आणि टँकर ही दोन्हीही वाहने घेऊन संबंधित चालक पसार झाले आहेत. पोलिसांकडून दोन्हीही वाहनांचा शोध सुरु आहे.

भरधाव डंपर घेतायेत अनेकांचे जीव
पुणे आणि पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अपघाताच्या संख्येत चांगलीच वाढ झाल्याचं बघायला मिळालं आहे. त्यात डंपरची धडक लागून झालेल्या अपघातांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हा डंपरचा वेग अनेकांच्या मृत्यूचं कारण बनत आहे. कालच भरधाव डंपरच्या धडकेत एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यासह त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. पुण्यातील वाघोली परिसरात हा अपघात झाला होता. अपघात झाल्यानंतर या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दुपारी एक वाजता केसनंद फाट्याजवळ डंपरने धडक दिली. यात दोघांचाीही मृत्यू झाला. यानंतर डंपर चालकाने पळ काढला. त्यानंतर आता पोलीस या डंपर चालकाचा शोध घेत आहेत.

अपघाताचं सत्र कधी थांबणार
पुणे जिल्ह्यात अपघाताच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. रोज अपघाताच्या घटना समोर येत आहेत. त्यात अनेकांचे नाहक जीव जात आहेत. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र अपघाताच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *