आधी पती अन् आता लेकही गेला, अंघोळ करतांना अमरावतीच्या तरुणाचा मुंबईत मृत्यू

अमरावती : बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या आरोग्याच्या अडचणी मोठ्या प्रमाणात निर्माण होतांना दिसत आहे.अशातच मुंबई येथे पोलीस भरतीला निघालेल्या तरुणाला रेल्वे स्टेशनवरच हार्टअटॅक आला.यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.खेदाची गोष्ट म्हणजे काही काळापुर्वीच तरुणावरील पितृछत्रही हरपले होते.

अमरावती शहरातील नवसारी परिसरात राहणारा अमर अशोक सोळंके(वय २५) हा मुंबई येथे पोलीस भरतीसाठी गेला होता.पहिल्या दिवशी त्याने सराव केला.गोळा फेक,पुश अप आणि रनिंग यांचा सराव झाल्यानंतर तो पोलीस भरती देण्याकरिता कवायत मैदानावर दाखल झाला.यावेळी त्याने पोलीस दलात दाखल होण्यासाठी जीवाची बाजी लावत शारीरिक चाचणीत पास होण्याचा खुप प्रयत्न केला.

फोर्ट परिसरातील रेसिडेन्सी हॉटेलमध्ये तो वास्तव्यास होता.अमरला मंगळवारी मैदानी चाचणी दिल्यानंतर अस्वस्थ वाटत होते,असे त्याच्या साथीदारांनी सांगितले.प्राथमिक अहवालानुसार हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मंगळवारी मैदानी चाचणी झाल्यानंतर अमरला अस्वस्थ वाटत होते.त्यानंतर सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आंघोळ करत असताना त्याला उलटी झाली आणि तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला.त्याला सेंट जॉर्ज हाॅस्पिटलमध्ये नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.त्याच्या पश्चात आई,भाऊ आणि १ बहीण असा परिवार आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *