आपली ३१ वर्षाची बायको २ लग्न झालेल्या तरुणांमाग पागल झाली, बायकोला थोडीशीही लाज वाटना मग गुंगीच औषध…

देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण कर्नाटकातील बेळगाव इथे समोर आलेले असून अनैतिक संबंधातून एका विवाहित महिलेने तिचा प्रियकर आणि त्याच्या साथीदारांच्या मदतीने पतीचा खून केलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे खून केल्यानंतर तिने आपल्या पतीचा मृतदेह गोव्यातील चोर्ला घाटात नेऊन फेकून दिला आणि स्वतः पती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली. सदर प्रकरणात पोलिसांनी विवाहित महिलेसह चार जणांना अटक केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, संध्या रमेश कांबळे असे आरोपी महिलेचे नाव असून तिचा प्रियकर बाळू विरंजे आणि त्याचे दोन साथीदार अशा चार जणांना एपीएमसी पोलिसांनी अटक केलेली आहे. तीन महिन्यांपूर्वी या महिलेने आपला पती बेपत्ता झाल्याची तक्रार एपीएमसी पोलीस ठाण्यात नोंदवलेली होती.

संध्या रमेश कांबळे (वय 31), बाळू विरंजे (36), जयमोहन ससाणे (20, तिघेही रा. आंबेडकरनगर, बेळगाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी येथेच राहणाऱ्या 17 वर्षांच्या युवकावरही खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रियकर बाळू बिरंजे याची याआधी दोन लग्ने झालेली असून त्यानंतर त्याचे संध्यासोबत सूत जुळलेले होते.

पोलिसांनी संशयावरून संध्या यांची चौकशी केली त्यावेळी तिने आपला गुन्हा कबूल केलेला असून तीन महिन्यांपूर्वीच आपण प्रियकर आणि इतर दोन जणांच्या सोबत हा प्रकार केलेला आहे असे सांगितलेले आहे. आपले बाळूसोबत असलेले प्रेमसंबंध हे पतीला सहन होत नव्हते तर दुसरीकडे तो देखील आपल्याशी व्यवस्थित वागत नव्हता म्हणून आपण त्याचा खून केलेला आहे असेही तिने म्हटले आहे . आरोपी महिला आणि तिच्या तिन्ही साथीदारांना गजाआड करण्यात आलेले आहे.

महिलेने म्हटल्याप्रमाणे जेवणात आपण पती रमेश याला झोपेच्या गोळ्या टाकून दिलेल्या होत्या त्यानंतर त्याला गुंगी आली आणि त्याच्यानंतर त्याचा गळा आवळून खून करण्यात आला असे सांगितलेले असून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने आम्ही सर्वांनी मिळून त्याचा मृतदेह गोव्यात नेऊन टाकलेला होता असे तिने म्हटलेले आहे. अद्यापपर्यंत रमेश याचा मृतदेह आढळून आलेला नसून पोलीस महिलेने सांगितलेल्या ठिकाणी मृतदेहाचा शोध घेत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *