आपल्या घरात गुप्तधन असल्याचं कोल्हापुरच्या महिलेला रात्री स्वप्नातं दिसायचं अन् धन शोधतांना खुपचं भयंकर घडलं

कोल्हापूर : बालिंगा ते शिरोली दुमाला रोडवरील पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील शेतात आरती आनंद सामंत (वय ४५ रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर) या महिलेचा खून हा गुप्तधन शोधाच्या तगाद्याला कंटाळून जोगेवाडीच्या मांत्रिकाने केल्याचे निष्पन्न झाले. नामदेव शामराव पोवार (वय ३४ रा. जोगेवाडी, ता. राधानगरी) असे अटकेतील मांत्रिकाचे नाव असल्याची माहिती करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पाडळी खुर्द येथे शेतात गुरुवारी रात्री आठ वाजता आरती सामंत यांचा खून झाल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. करवीर पोलिसांनी घटनास्थळाची परिस्थिती, मोबाईल लोकेशन तपासत संशयित मांत्रिक नामदेव पोवार याला राशिवडे येथील बिरदेव मंदीराच्या आवारात अटक केली. त्याने गुन्ह्याची कबूली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुप्तधन काढून दे….
आपल्या घरात गुप्तधन असल्याचे स्वप्नात येत असल्याचे मृत आरती सामंत ह्या वारंवार सांगत होत्या. त्यांनी काही मांत्रिकांना गुप्तधन काढून देण्याबाबत तगादा लावला होता. पुलाची शिरोली येथीलही एका मांत्रिकाला त्यांनी गुप्तधनाबाबत माहिती दिली. त्याचे त्यांच्याशी मैत्रिपूर्ण संबंध वाढले होते, त्यानंतर सहा महिन्यापासून सामंत यांनी नामदेव पोवार याही मांत्रिकामागे गुप्तधन शोधून देण्याबाबत तगादा लावला.

त्यांची जुन्या मांत्रिकाशी वाढलेली मैत्री संशयीत पोवार याला सतावत होती. त्याच रागातून व गुप्तधन शोधाच्या तगाद्याला कंटाळून संशयिताने सामंत यांच्या डोक्यात वीट मारुन खून केला. अंगावरील सोन्याच्या पाटल्या, मंगळसुत्र, बांगड्या व मोबाईल असा मुद्देमाल चोरुन पोबारा केला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *