‘आमची आई कुठयं पप्पा’, २ मुलींना आईला पहायचं पण घरात घेतला होता गळफास, कोल्हापूरात ह्रदयद्रावक घटना

कोल्हापूर : दोन मुली असल्याने आणि वंशाचा दिवा पाहिजे म्हणून सासरी होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून दोन मुलींची आई असलेल्या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अस्मिता केदारी चौगले (वय ३०, रा. कोथळी, ता. करवीर) असं विवाहितेचे नाव असून पती सासू आणि सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगा पाहिजे म्हणून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याने सदर विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी हा सर्व प्रकार उघडकीस आला. विवाहितेचे वडील दगडू सदाशिव यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अस्मिता आणि केदारी यांचा १३ वर्षांपूर्वी केदारी यांच्याशी विवाह झाला होता.

केदारी आणि अस्मिता यांना एक ९ आणि दुसरी ८ वर्षांची अशी दोन मुली आहेत. त्यामुळे मुलगा होत नसल्याने पती, सासू आणि सासऱ्याकडून तिचा शारीरिक, मानसिक छळ सुरू होता. या त्रासाला कंटाळून अस्मिताने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान, पतीने पत्नीने गळफास घेतल्याचे निदर्शनास येताच पतीने गळफास सोडवून तिला तातडीने सीपीआर रूग्णालयात दाखल केले.

मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली असून मृत अस्मिता केदारी चौगलेचा पती केदारी गणपती चौगले, सासू आनंदी गणपती चौगले आणि सासरा गणपती गुंडू चौगले तिघे रा. कोथळी, ता. करवीर यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *