‘आमच्या लेकरांऐवजी आमचाचं जीव घ्यायचा ना देवा’,पुण्यात सख्या भावांचा करुण अंत; आई-पित्याचा आक्रोश पाहुन गावं सुन्न

इंदापूर: निमगाव केतकी येथे यात्रेसाठी निघालेल्या कुटुंबाचा पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खडकी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत अपघात झाला. कारला झालेल्या अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या अपघातात मुलांचे आई, वडील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे निमगाव केतकी (ता. इंदापूर) परिसरात शोककळा पसरली आहे.

आर्यन संतोष भोसले (वय १२ वर्षे) आणि आयुष संतोष भोसले (वय ८ वर्षे) या दोन भावांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात त्यांचे वडील संतोष भोसले व आई अश्विनी संतोष भोसले यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

निमगाव केतकीतील संतोष एकनाथ भोसले त्यांच्या कुटुंबासह पुण्यात नोकरीनिमित्त स्थायिक होते. निमगाव केतकी येथील केतकेश्वर महाराज यात्रेनिमित्त भोसले कुटुंबीय शनिवारी (१ एप्रिल) पुणे-सोलापूर महामार्गावरून कारने गावी निघाले होते. भोसले कुटुंबाच्या चारचाकीला महामार्गावर खडकीजवळ भीषण अपघात झाला. यात संतोष भोसले, त्यांची पत्नी आणि दोन मुलगे गंभीर जखमी झाले.

पुणे येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आर्यनचा गुरुवारी तर आयुषचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. संतोष व अश्विनी भोसले हेदेखील अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.संतोष भोसले यांच्यासह तिन्ही अपघातग्रस्तांवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. यातील आयर्न भोसले हा इयत्ता सातवीमध्ये शिकत होता, तर आयुष भोसले हा तिसरीत शिकत होता. या घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *