‘आम्ही जातो आमुच्या गावा, मी फाशी घेतोय…, सुसाईड नोट ठेऊन😥सागरनी शेडमधी जीव दिला

संगमनेर, अहमदनगर : सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत असून जालन्याच्या आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला राज्यभरातून मराठा समाजाचा पाठिंबा मिळताना दिसतोय. अनेक ठिकाणी मराठा समाजाच्या सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.

सरकार आरक्षणाबाबत लवकर निर्णय घेत नसल्याने मराठा समाजातील तरूण वर्गात नाराजी असून अनेक जण टोकाचं पाऊल उचलत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात समोर आला असून मराठा आरक्षण मिळत नसल्याने चिट्ठी लिहून युवकाने गळफास घेत आत्महत्या केली.मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील झोळे गावातील रहिवाशी असलेला सागर भाऊसाहेब वाळे या (वय 25) तरुणाने मंगळवारी पहाटे आपल्या राहत्या घराच्या मागील बाजूस पत्राच्या शेडमध्ये जाऊन गळफास घेतला.

त्याच्याकडे सुसाइड नोट मिळाली असून त्यात त्याने लिहिले आहे की, “आम्ही जातो आमच्या गावा,एक मराठा लाख मराठा, आम्हाला आरक्षण नसल्यामुळे मी फाशी घेत आहे कोणाला जबाबदार धरू नये, एक मराठा लाख मराठा, आपला लाडका सागर मराठा” असे लिहिले आहे. सदर घटनेने संगमनेर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान आज आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती यांनी उपोषणस्थळी जात मनोज जरांगे यांची भेट घेतली. तसेच त्यांना प्रकृती जपण्याचाही सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आज सकाळी जरांगे पाटलांशी फोनवरुन चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांच्या तब्येतीची माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांशी झालेली चर्चा समाधानकारक झाल्याने जरांगे पाटील यांनी पाणी घेतले. यावेळी जरांगे यांनी अर्धवट आरक्षण घेणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांना ठणकावून सांगितले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *