‘आम्ही मेल्यानंतरही कोणाला त्रास देणार नाही, माझ्या स्वभावामुळचं… ७ जणांच्या😥कुंटुबानी घेतलं दुधातुन विष

गांधीनगर: सूरतमध्ये एका कुटुंबातील सात जण मृतावस्थेत आढळून आले. यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. त्यांनी सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. सूरतमधील अडाजन परिसरात ही घटना घडली. सात जणांपैकी एकानं (मनिष सोळंकी) गळफास लावून आत्महत्या केली. तर अन्य सहा जणांचा मृत्यू विष प्राशन केल्यानं झाला. घरात एका ठिकाणी बाटली सापडली आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून तपास सुरू आहे.

मनिष सोळंकीच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडल्याची माहिती पोलीस आयुक्त अजय कुमार तोमर यांनी दिली. आम्ही सगळ्यांसोबत चांगलं वागलो. सर्वांच्या भल्याचा विचार केला. पण आमच्यासोबत कोणीही चांगलं वर्तन केलं आहे, असा उल्लेख चिठ्ठीत आहे. ‘मी दिवस कसे ढकलतोय हे माझं मला माहीत आहे. माझ्यानंतर माझी मुलं, आई-वडील कसे जगतील? ते माझ्याशिवाय राहू शकत नाहीत. त्यांची मला चिंता वाटते. हे पत्र लिहिण्यामागे खासगी कारणं आहेत. पण मला इथे त्यांची नावं घ्यायची नाहीत. जिवंत असताना कोणाला त्रास दिला नाही. मेल्यानंतरही कोणाला त्रास देऊ इच्छित नाही. माझा परोपकारी आणि कनवाळू स्वभावच माझ्यासाठी त्रासदायक ठरला,’ असं सोळंकी यांनी पत्रात म्हटलं आहे.

पोलिसांनी सुसाईड नोट फॉरेन्सिक तपासासाठी पाठवली आहे. नोटमध्ये कोणाच्याही नावांचा उल्लेख नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी सोळंकी कुटुंबियांच्या शेजाऱ्यांची, नातेवाईकांची चौकशी करण्यात येणार आहे. मृतांचे सीडीआरदेखील तपासण्यात येतील. पोलिसांसोबत फॉरेन्सिक आणि मेडिकल टीमदेखील या प्रकरणावर काम करत आहे. डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडून तपास सुरू आहे.

प्रकरण काय?
सूरतच्या अडाजन परिसरात शनिवारी एकाच कुटुंबातील साज जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरावर शोककळा पसरली. सोळंकी कुटुंब सिद्धेश्वर अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर वास्तव्यास होतं. पोलीस सोळंकी कुटुंबाच्या घरी पोहोचले तेव्हा कनुभाऊ यांचा मुलगा मनिष सोळंकी गळफास लावलेल्या स्थितीत दिसला. तर कनुभाई, त्यांची पत्नी शोभनाबेन, मनिषची पत्नी रिटा, मुलगा कुशल, मुली दिशा आणि काव्या यांचे मृतदेह बिछान्यावर पडले होते.

मनिष सोळंकी इंटीरियर डिझायनिंग आणि फर्निचरचं काम करायचा. पोलिसांना सापडलेल्या नोटमध्ये उधार दिलेल्या आणि ते परत न केल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे मनिषनं आर्थिक विवंचनेतून टोकाचं पाऊल उचलल्याची शक्यता आहे. पोलिसांना घरात सापडलेल्या बाटलीमध्ये विष सापडलं आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *