आयुष्यभर साथ देण्याचं वचन निभावलं, पत्नीचा जीव वाचवतांना पतीचाही दुर्देवी मृत्यू; पतीचं प्रेम पाहुन संपुर्ण परिसर हळहळला
ग्वाल्हेर – करंट लागून पती-पत्नीचा मृत्यू झाला. स्थानिकांच्या मते, 57 वर्षीय सुल्वा सालकडे घराच्या अंगणात लोखंडी तारेवर कपडे वाळवत होत्या. जवळच वॉशिंग मशीन ठेवलेली होती, ती पूर्णपणे खराब होती, मशीनला त्यांचे पती विलास सालकडे सुधारण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान सुल्वा यांना विजेचा धक्का बसला. तारेला चिकटल्याने पत्नी ओरडली म्हणून वाचवण्यासाठी विलास (पति) त्यांच्याजवळ गेले, तेव्हा त्यांना विजेचा धक्का बसला आणि दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला.
शेजाऱ्यांना ऐकला आवाज
सालकडे दांपत्याचे शेजारी म्हणाले की, दोघांचे ओरडणे ऐकू आले होते. सर्वात आधी शेजारची महिला मंजू यांनी किंकाळी ऐकली तेव्हा त्यांनी घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु गेटमध्ये करंट आल्याने त्यांना हलका झटका बसला.
यानंतर इतर शेजारी गोळा झाले आणि त्यांनी वीज मीटरमधून विद्युत प्रवाह बंद केला. मग घराबाहेर जमा झालेले लोक घरात दाखल झाले. पाहिले तर दोघेही पती-पती अंगणात उभ्या एक्टिव्हाजवळ पडले होते. लोखंडी तार दोघांना चिकटलेला होता आणि तोंडातून फेस येत होता.
पोलिसांनी प्रकरण दाखल करून तपास सुरू केला, आज होईल पोस्टमार्टम
माधौगंजचे टीआय एसएस गौर म्हणाले की, प्रकरण दाखल करून तपास सुरू केला आहे. प्राथमिकदृष्ट्या वॉशिंग मशीन ठीक करताना करंट लागून सालकड़े दांपत्याचा मृत्यू झाल्याचे वाटत आहे. तथापि, सालकडे परिवारातील मुलगा शहराबाहेर आहे. यामुळे शुक्रवारी पोस्टमार्टम होऊ शकले नाही. शनिवारी त्यांचा मुलगा आल्यानंतर पोस्टमार्टम केले जाईल. दोघांची बॉडी पोस्टमार्टम हाऊसमध्ये ठेवण्यात आलेली आहे.