‘आये…मला माफ कर गं, माझ्या मरणास… आईच्या लाडक्या प्रियंकान चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
नाशिक : विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यात उघडकीस आली आहे. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी घेत महिलेने आयुष्याची अखेर केली. ”आई मला माफ कर” अशी चिठ्ठी आईच्या नावे लिहित महिलेने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
आईच्या नावे सुसाईड नोट
प्रियंका पगारे (रा. कृष्णा अपार्टमेंट, माहेरघर मंगल कार्यालयसमोर, खुटवड नगर) असं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललेल्या 24 वर्षीय महिलेचं नाव आहे. ‘आई मला माफ कर, माझ्या मरणास कोणालाही कारणीभूत ठरवू नये’ अशी सुसाईड नोट प्रियंकाने लिहिल्याची माहिती आहे.
इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी
प्रियंकाने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवरुन उडी मारत आपली जीवनयात्रा संपवली. नाशिकमधील सिडको भागातील खुटवडनगर परिसरामध्ये रविवारी सकाळी हा प्रकार घडला.
आत्महत्येचं नेमकं कारण अस्पष्ट
तिला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयातील दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. प्रियंकाच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. अंबड पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.