आरक्षणासाठी कोमलची दुसर्या मजल्यावर आत्महत्या, बाॅडीशेजारी सापडलेल्या चिठ्ठीने शहर हळहळले

नांदेड: मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यात आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. नववी वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आरक्षणाची मागणी करत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कोमल बोकारे (१४, रा. सोमेश्वर) असं या मुलीचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी तिने चिठ्ठी लिहिल्याचा दावा तिच्या कुटुंबियांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोमल बोकारे ही नांदेड तालुक्यातील सोमेश्वर येथील रहिवासी आहे. तिचे वडील तुकाराम बोकारे हे अल्पभूधारक शेतकरी आहे. त्यांना पाच मुलगी असून कोमल ही दुसऱ्या नंबरची होती. गुरुवारी सकाळी ९.३० दरम्यान तिने दुसऱ्या मजल्यावरील रूममध्ये गळफास घेतला.

ही बाब समजल्यानंतर कुटुंबियांनी तिला तात्काळ राहटी येथील खाजगी रुग्णालयात नेले. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. गुरुवारी मध्यरात्री तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गावात साखळी उपोषण सुरु आहे. या उपोषणाला कोमल देखील बसायची. असं गावकऱ्यांनी सांगितले. मात्र तीने टोकाचं पाउल उचलल्याने सर्वाना धक्का बसला आहे. कुटुंबियांवर दुःखाच डोंगर कोसळलं आहे.

या घटनेनंतर सोमेश्वर येथील ग्रामस्थ आक्रमक होतं आंदोलन स्थळी मृतदेह देऊन शासनाचा निषेध केला. जो पर्यंत प्रशासन या घटनेची दखल घेत नाही तो पर्यंत मृतदेहावर अंतविधी करणार नसल्याची भूमिका गावाकऱ्यांनी घेतली होती. दरम्यान उपजिल्हाधिकारी विकास माने आणि तहसीलदार संजय वरकड यांनी भेट देऊन चर्चा केली.

या प्रकरणी लिंबगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. कोमल बोकारे हिच्या मृतदेहा जवळ चिठ्ठी कुटुंबियांना सापडली आहे. मराठा समाजाला आरक्षण लवकर द्यावं. माझं बलिदान व्यर्थ जाऊ नये. आई अण्णा मला माफ करा असं चिठ्ठीत उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान कोमलने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहल्याचा दावा तिच्या कुटुंबियांनी केला आहे. दरम्यान आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यात आता पर्यंत पाच जणांनी आत्महत्या केली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *