इडली सांबरमुळं गेला मुलीला जीव, नगरमध्ये पेपर सुरु असतांनाच विद्यार्थीनींचा मृत्यू

अहमदनगर : बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थी आणि पालक अभ्यासासोबतच खाण्यापिण्याचीही चांगलीचं काळजी नक्कीचं घेतात.मात्र अहमदनगर जिल्ह्यातीस लोणी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे.बारावीचे पेपर देणाऱ्या मुलीने आजोबांसोबत रात्रीचे उरलेले इडली-सांबर खाल्ले.त्यानंतर दोघांनाही विषबाधा झाली.त्यात उपचार सुरू असताना विद्यार्थीनीची सोमवारी दुपारी प्राणज्योत मालवली.

तेजस्विनी मनोज दिघे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचे तिचे हिचे स्वप्न मात्र अपूर्णच राहिले.या प्रकारामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.सुदैवाने तेजस्विनीचे आजोबा यातुन बचावले आहेत.

या घटनेत संबंधित अधिक माहिती अशी कि,लोणी येथील तेजस्वनी दिघे बाभळेश्वर येथील कनिष्ठ महाविद्यालयात बारावीत शिक्षण घेत होती.तिची बारावीची परीक्षा सुरू होती.प्रवरानगर येथील केंद्रावर तिचा नंबर लागला होता.याआधी विज्ञान शाखेचे काही पेपर तिने दिले होते.मागच्या बुधवारी रसायनशास्त्राचा पेपर होता.त्या दिवशी बुधवारी सकाळी तिने आणि तिचे आजोबा भीमराज दिघे या दोघांनी रात्रीचे उरलेले इडली-सांबर खाल्ले.

तिचे आजोबा भीमराज दिघे हे रयत शिक्षण संस्थेमधुन मुख्याध्यापक म्हणुन निवृत्त झाले आहेत.रात्रीचे शिळे इडली-सांबर खाणे त्यांना चांगलेच महागात पडले.काही वेळातच दोघांनाही अस्वस्थ वाटु लागलं.त्यामुळे त्यांना लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या हाॅस्पिटलमध्ये नेण्यात आले.तिथे पोट दुखत असल्याची त्यांची तक्रार होती.मात्र,नेमके निदान होत नव्हते.त्यामुळे त्यांना प्रथम संगमनेरला नेले आणि त्यानंतर पुण्यातील KEM हॉस्पिटलला हलविण्यात आले.

तेव्हापासुन त्यांच्यावर KEM हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.एका बाजुला जगण्याची धडपड सुरु होती तर दुसरीकडे बारावीचे उरलेले पेपर बुडत होते.अखेर तेजस्विनी जगण्याची लढाईही हरली.सोमवारी सकाळी तिने रुग्णालयातच प्राण सोडले.त्यात तिचे आजोबा मात्र सुदैवाने बचावले आहेत.

तेजस्विनी सायन्स शाखेतुन बारावीचे शिक्षण घेत होती.पुढं जाऊन तिला डॉक्टर होण्याची इच्छा होती.त्यासाठी तिने तसा अभ्यासही केला होता.पहिले काही पेपर दिल्यानंतर तिच्यावर हे दुर्दैव ओढावले.त्यात तिने जीव गमावला.त्यामुळे तिचे आणि कुटुंबयांचेही स्वप्न भंगले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *