इथे मुलीसाठी स्वतः खोली सजवतो बाप; लग्नाआधी 10 मुलांसोबत घालवते रात्र, कारण वाचून वाटेल कौतुक

मुंबई : देशात आणि जगात करोडो संस्कृती आणि समाज अशा आहेत,ज्यात अशा बर्याचं गोष्टी आहेत ज्या पहिल्यांदा ऐकल्यावर जरा विचित्र वाटतात.पण,तिथल्या स्थितीच्या आणि गरजेच्या काळात या संस्कृतींनी अतिशय उत्तम काम केलं आहे.आम्ही तुम्हाला आज अशाच एका संस्कृतीबद्दल सांगणार आहोत.या संस्कृतीत मुलीच्या सुखी वैवाहिक जीवनाला अतिशय महत्त्व दिलं जातं.

या संस्कृतीत,जेव्हा बाप आपल्या लेकीसाठी वर शोधण्याची प्रक्रिया सुरू करतात,तेव्हा त्यांची पहिली प्राथमिकता मुलीची इच्छा आणि निवड असते.त्यामागचं कारण असं कि जेव्हा मुलगी तिच्या आवडीच्या मुलाशी लग्न करते तेव्हा ते वैवाहिक जीवन आनंदमय होण्याची जास्त शक्यता असते.त्यामुळेच या समाजात यशस्वी विवाहाचे प्रमाण 99% पेक्षाही जास्त आहे.

हा समाज आहे दक्षिण पुर्व आशियाई देश कंबोडियाचा.येथे क्रेउंग जमातीचे लोकांची संख्या जास्त आहे.चांगल्या आणि आधुनिक विचाराच्या बाबतीत तुम्ही या क्रेउंग लोकांची संस्कृती खुप पुढे आहे असं म्हणु शकता.यामध्ये स्त्रियांचा खुप आदर आहे.हा समाज मुलींच्या निवडीला प्राधान्य देतो.अशा स्थितीत मुलगी मोठी झाल्यावर इतरांप्रमाणे या समाजातील वडिलांनाही त्यांच्या लग्नाची काळजी वाटते.

मग त्यांच्या परंपरेनुसार ते स्वत:च्या हाताने घरापासुन दूर आपल्या लेकीसाठी ‘लव हट’ बांधतात.लव्ह हट हि संकल्पना अशी आहे,ज्यात मुलगी घरातुन किंवा घरापासुन दूर तिच्या कुंटुबियाच्या नजरेपासुन दूर मोकळ्या वातावरणात राहु शकते.मुलगी या लव हटमध्ये राहु लागते.तिथे काही काळ एकटं असताना,ज्यांच्याशी तिला लग्न करण्याची इच्छा असते ती सर्व मुलेही एक एक करून तिथे पोहोचतात.

मुलगा आणि मुलगी एकमेकांना समजुन घेण्याचा प्रयत्न करतात.ते एकमेकांच्या आवडी-निवडी आणि स्वभाव जाणुन घेण्याचा प्रयत्न करतात.तसेच इच्छा असेल तर सहमतीनुसार एकमेकांसोबत शारीरिक संबंधही ठेवु शकतात.हि प्रक्रिया तोपर्यंत सुरू राहाते,जोपर्यंत मुलगी आपल्या आवडीनुसार योग्य नवरदेवाची निवड करत नाही.लव्ह हट हि संकल्पना या समाजात फार महत्त्वाची आहे.वास्तविक,या परंपरेचा मुळं उद्देश मुलीने खरे प्रेम शोधणे हा आहे.या वेळेत मुलीवर कोणतेही दडपण येऊ नये म्हणुन तिच्यासाठी घरापासून दुर झोपडी बनवली जाते.यामुळे स्वेच्छेने मुलीना आपले खरे प्रेम शोधता येते,असं हे लोक मानतात.

इथे अजुन अजब परंपरा म्हणजे येणारी सर्व मुलं हे फक्त रात्रीच्या अंधारातचं झोपडीत शिरु शकतात आणि पहाटे उजेड पडायच्या आतचं निघुन जातात.म्हणजेच इथे मुलगा आणि मुलीच्या नात्याच्या गुप्ततेलाही महत्त्व दिलं जातं.यामुळे पुढं जाऊन वैवाहिक जीवनात कोणतीही अडचण येत नाही.त्यातही दुसरी लक्षणीय गोष्ट हि कि या आदिवासी समाजात केवळ विवाहित दाम्पत्यचं दिवसाच्या प्रकाशात एकत्र दिसतात.

मिळालेल्या माहितीनुसार,खऱ्या प्रेमाच्या शोधात मुली जवळपास ४ ते 10 मुलांना लव्ह हटमध्ये आमंत्रित करतात.हि सगळी मुलं वेगवेगळ्या रात्री झोपडीत येतात.यामध्ये लक्षात घेण्यासारखे आहे की यात मुलगी आणि मुलगा यांच्यात शारीरिक संबंध ठेवणे बंधनकारक नाही.हे सगळं त्या दोघांच्या इच्छेवर अवलंबुन असते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *