उन्हामुळं आईनी चिमुकली पार्किंगमध्ये झोपवली अन् SUV छातीवरुन गेली, गाढ झोपेतचं छातीवर टायर आलं…,

Viral Video: गरिबीतला संघर्ष अनेकदा जीवावर बेततो. डोक्यावर छत नसल्याने अनेक लोक जीव मुळीत घेऊन रस्त्यावर झोपत असतात. सध्याच्या गर्मीत तर त्यांना रस्त्यांवर झोपणंही असह्य होत आहे. यासाठीच मग झाडं किंवा एखाद्या इमारतीच्या आडोशाला सावलीचा आधार घेतला जातो. दरम्यान, हैदराबादमध्ये (Hyderabad) ऊन सहन होत नसल्याने एका इमारतीच्या पार्किंगमध्ये झोपणं चिमुरडीच्या जीवावर बेतलं आहे. पार्किंगमध्ये झोपलेली असताना SUV अंगावरुन गेल्याने तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.

बाहेर असह्य ऊन असल्याने तीन वर्षांची चिमुरडी एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये झोपली होती. यादरम्यान, इमारतीत पार्किंगसाठी आलेली एसयुव्ही अंगावरुन गेल्याने चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. ही सर्व घटना इमारतीच्या सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय महिलेने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. कविता असं या महिलेचं नाव असून कर्नाटकच्या गुलबर्गा येथील शाबाद मंडलची रहिवासी आहे. गुरुवारी रात्री 10 वाजता तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

कविताने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, कामाच्या शोधात आपण मुलांना घेऊन हैदराबादमध्ये आलो होतो. बुधवारी हयातनगर येथील लेक्चर्स कॉलनीमध्ये एका निर्माणधीन इमारतीत काम करण्यासाठी मी पोहोचली होती. दुपारी 2.30 वाजता मी 6 वर्षांचा मुलगा बसवा राजू आणि 3 वर्षांची मुलगी लक्ष्मी यांच्यासह जेवण केलं. यानंतर ऊन सहन होत नसल्याने माझी मुलगी जवळच असणाऱ्या बालाजी आर्केड अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये झोपायला गेली.

दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी बेसमेंटमध्ये झोपलेली असताना एक एसयुव्ही इमारतीत आली. हरी राम कृष्ण हे गाडी चालवत होते. इमारतीत प्रवेश केल्यानंतर तिथेच खाली एक मुलगी झोपली आहे याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. त्यांनी गाडी पार्किंगसाठी पुढे नेली असता ती लक्ष्मीच्या अंगावर गेली. गाडी अंगावर गेल्याने लक्ष्मीचा जागीचा मृत्यू झाला.

इमारतीच्या बेसमेंटमध्ये लागेल्या सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास करत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *