उल्हासनगरमध्ये दिराचा हत्येची मुख्य सुत्रधार निघाली वहिनी, किरकोळ गोष्टीवरुन कोणी खुन करता का?

उल्हासनगर : संपत्तीच्या वादतून भर चौकात तीन नातेवाईकांनी मिळून एका नातेवाईकाची निर्घृण हत्या करत त्यांच्यासोबत असलेल्या पती-पत्नीवरही हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली होती. ही घटना उल्हासनगर शहरातील अंबरनाथ-बदलापूर मार्गावरील फार्व्हर लाईन चौकात घडली होती.

या हत्येला आता कलाटणी मिळाली असून दिराच्या हत्येचा कट वहिनीने रचल्याचे पोलीस तपासात समोर आल्याने आरोपी वहिनीला मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली आहे. तसंच आईच्या सांगण्यावरून काकाची हत्या करणाऱ्या दोन्ही पुतण्यांना पोलिसांनी पाच तासातच अटक केली.

सुनीता मरोठीया असे मुख्य सूत्रधार असलेल्या अटक वहिनीचे नाव आहे, तर योगेंद्र उर्फ भोला मरोठीया, गणेश उर्फ शालू मरोठीया अशी अटक केलेल्या पुतण्यांची नावे असून तिसरा आरोपी हा जावई आकाश वाल्मिकी आहे. त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. मनवीर मरोठीया असे हत्या झालेल्या दिराचे नाव आहे. रामपाल करोतिया आणि राखी करोतिया असं हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पती-पत्नीचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक मनवीर मरोठीया हे उल्हासनगर शहरातील फार्व्हर लाईन भागात असलेल्या इमली पाडा परिसरात कुटुंबासह राहत होते. त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून मृत मनवीर आणि त्यांच्या मरोठीया कुटुंबात संपत्तीवरून वाद सुरू होते. याच वादातून २४ एप्रिल रोजी आरोपी वहिनीचे मृतक दिरासोबत जोरदार भांडण झाले होते.

त्यावेळी भांडणात बेदम मारहाण झालेल्या आरोपी वहिनीला जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यामुळे रुग्णालयात उपचार सुरू असतानाच आरोपी वहिनीने तिच्या दोन मुलांसह जावयासोबत दिराच्या हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

हत्येचा कट रचल्यानंतर ३१ मार्च रोजी सकाळच्या सुमारास मृत मनवीर हे कामावर जात असतानाच, आधीच घात लावून बसललेल्या दोन पुतणे आणि जावई या तिघांनी फार्व्हर लाईन चौकात मनवीर यांना गाठून त्यांच्यावर तलवार आणि लाकडी दांडक्याने हल्ला करून जागीच ठार केले. शिवाय मनवीर सोबतच कामावर जाणारे रामपाल करोतिया आणि राखी करोतिया यांच्यावरही हल्लेखारांनी हल्ला केला.

या हल्ल्यात मनवीर यांच्यावर तलवारीने गंभीर वार झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर संपत्तीच्या वादात मध्यस्थी करणारे रामपाल आणि राखी करोतिया हे जखमी झाले आहेत.दरम्यान, तीन हल्लेखोरांनी लाकडी दांडके आणि तलवारीच्या साहाय्याने भर चौकात केलेल्या हत्याच्या थराराने शहरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात रवाना करून तीन हल्लेखोरांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

हल्लेखोर हे फरार झाले होते. उल्हासनगर क्राईम ब्रांच आणि मध्यवर्ती पोलीस पथकाने मुंबईतील विलेपार्ले भागातून काकाची हत्या करणाऱ्या दोन्ही पुतण्यांना पाच तासातच अटक केली. त्यांच्या अटकेनंतर मनवीर यांच्या हत्येच्या कटात मुख्य सूत्रधार असलेल्या वहिनी सुनीताला कालच शासकीय रुग्णालयातून डिचार्ज दिल्यानंतर तिला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *