उस्मानाबादमध्ये विवाहित महिलेला प्रेमात ओढलं,मोकार पैसा उडवुन कर्जबाजारी झाल्यावर वेगळाचं पराक्रम केला

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका मुलाने आपल्या प्रेयसीवर केलेल्या खर्चाची वसुली करण्यासाठी वेगळा फंडा वापरला.त्याने चक्क गर्लफ्रेंडच्या मुलाचे फिल्मी स्टाईल अपहरण केले.उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.सदर प्रकरणाचा तपास नळदुर्ग पोलिसांनी अवघ्या १२ तासांत लावला.मुख्य आरोपी आणि त्याच्या २ साथीदारांना सोलापुर आणि सांगली जिल्ह्यातुन अटक केलं आहे.

प्रेयसीवरील खर्चाने झाला कर्जबाजारी
किरण लादे या मुलाचे अपहरण करण्यात आलेल्या मुलाच्या आईसोबत अनेक वर्षांपासुन अनैतिक संबंध होते.संबंधातुन ते एकत्र राहत होते.किरण लादे हा त्याच्या गर्लफ्रेंडवर म्हणजेच अपहरण केलेल्या मुलाच्या आईवर मोठ्या प्रमाणात पैसा उडवायचा.त्यामुळे तो प्रचंड कर्जबाजारी झाला होता.

भांडण झाल्याने विभक्त राहिले
काही दिवसांपुर्वी किरण लादे आणि त्याच्या जानुचे खटके उडाले.दोघांमध्ये कडाक्याचे भांडण होऊन ते वेगळे झाले.याचाच राग प्रेयसीवर होता.आपण एवढा पैसा खर्च करुनसुध्दा ति सोडुन गेल्याचा राग किरणच्या मनात होता.

नळदुर्ग पोलिसांत तक्रार
याचा राग मनात धरून किरणने थेट आपल्या साथीदाराच्या मदतीने प्रियसीच्या मुलाचे अपहरण केले.२ लाख रुपयाच्या खंडणीची मागणी केली.मुलगा गायब झाल्याने आईने नातेवाईकांसह तातडीने नळदुर्ग पोलिस स्टेशनात धाव घेत तक्रार दिली.

दोन पथकांनी तपास केला
नळदुर्ग पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत आपले सुत्र हलवली.दोन पथकं तयार करत सांगली फोनच्या लोकेशनवरून सांगली आणि सोलापुरमध्ये तपास सुरु केला.अखेर आरोपीच्यां मुसक्या आवळल्या आणि अपहरण झालेल्या मुलाला सुटका करुन त्याला आईच्या स्वाधीन केले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *