एकाची चुक दुसर्यांवर बेतली, संभाजीनगरमध्ये पती-पत्नी शरीराचा मिनीटात चेंदामेंदा

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातील काम आटोपुन घरी गावी निघालेल्या पती-पत्नीच्या दुचाकीला भरधाव वेगात खडी घेऊन जाणाऱ्या हायवेवर भरधाव ट्रकने धडक दिल्याने ते टायर खाली आले.या अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर-नाशिक महामार्गावरील देवगाव रंगारि गावाजवळ घडली आहे.

राजेंद्र पंडित कुलकर्णी(वय -४५) आणि सीमा राजेंद्र कुलकर्णी(वय ४० रा. मनेगाव, वैजापूर) असे अपघातात मृत्यूमुखी पावलेल्या दांम्पत्याचे नाव आहे.या घटनेबाबत अधिक माहिती अशी की,राजेंद्र यांना छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये काही वैयक्तिक काम असल्याने ते पत्नी सीमासह त्यांच्या दुचाकीने शहरात आले होते.दिवसभर शहरातील काम आटोपुन संध्याकाळी राजेंद्र आपली पत्नी सीमासह परत दुचाकीने त्यांच्या गावी निघाले.

दरम्यान देवगाव रंगारीच्या सुमारे 2 km अंतरावर आल्यावर खडी वाहतुक करणाऱ्या भरधाव वेगात येणार्या हायवा ट्रकने कुलकर्णी यांच्या दुचाकीला जोर्यात धडक दिली.त्यात कुलकर्णी आणि त्यांची पत्नी खाली जमिनीवर पडताच ट्रकच्या चाकाखाली चिरडले गेले.दोघांना चिरडल्यावर ड्रायव्हर तेथुन हायवा घेऊन पसार झाला.उपस्थितांनी त्या ट्रकचा काही किलोमीटर पाठलाग केला.लोक आपला पाठलाग करीत असल्याचे पाहुन हायवासोडून ड्रायव्हर फरार झाला.

घटनेची माहिती मिळताचं पोलिसांनी धाव घेत कुलकर्णी दाम्पत्यांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात हलविले.या अपघात प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.कुलकर्णी दाम्पत्यांना २ मुलं आहे.अपघातात आई – वडिलांचा मृत्यू झाल्याने दोन्ही लेकरांवरील छत्र हरपले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *