एक चूक अन् शेतकरी महिलेचा भयानक मृत्यू, भंडार्यात अख्ख गाव हळहळलं

भंडारा : शेतातील उडीद पिकाची मळणी सुरू असताना मळणी यंत्रात साडी अडकुन एका महिलेचा गुरफडून मृत्यू झाल्याची हादरवणारी घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदुर तालुक्यातील दोनाड येथे घडली.या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शीतल धर्मशील कोचे(वय 52) असे मृतक महिलेचे नाव आहे.सध्या भंडारा जिल्ह्यात उडीद,सोयाबीन,हरभरा,वटाणा अशा विविध पिकांची काढणी करून त्याची मळणी करण्याचे काम सुरू आहे.

अशातच शीतल धर्मशील कोचे यांच्या स्वतःच्या शेतातील उडीद पिकाची मळणी करण्यासाठी रनचंद बगमारे यांची ट्रॅक्टर सह मळणी यंत्र सुरू होते.यावेळी शीतल मळणी यंत्र आणि ट्रॅक्टरच्या मधोमध उभ्या असताना त्यांची साडी लोखंडी सॉफ्टिंगला अडकुन त्यात गुरफडल्याने शितल यांचा जागीच मृत्यू झाला.

सदर घटनेची माहिती गावात पोहचताच गावकर्यांनी घटनास्थळाकडे एकच गर्दी केली.लाखांदुर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचुन पंचनामा केला.यावेळी बाॅडी शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असुन लाखांदुर पोलीस घटनेचा पुढील तपास करीत आहेत.शीतल यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *