‘ऐ तोंडवाशे-काळे, तु मला नडती काय’, शिक्षिकांनी एकमेकींना मातीत लोळून लोळून मारलं…हसतचं रहाल

Bihar Teachers fighting Viral Video : सोशल मीडियावर दररोज अनके व्हिडिओ व्हायरल होत असतात.काही व्हिडिओ मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत दोन शिक्षिकांनी शाळेतच तुफान मारामारी केली आहे. एकमेंकांच्या झिंज्या काय उपटल्यात आहेत, लाथा बुक्के काय मारलेत, अशा प्रकारची ही मारामारी झाली आहे.या मारहाणीचा संपूर्ण व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे. (bihar patna viral video two women teachers fierce fight in school viral news)

व्हायरल झालेल्या व्हिडओतील दोन महिला शिक्षकांच्या कोणत्या तरी गोष्टीवरून वाद झाला होता.सुरूवातीला हा शाब्दीकच होता.मात्र वाद वाढल्याने तो मारामारीपर्यंत गेला. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, या महिला शिक्षकाने एकमेकींसोबत हुज्जत घालत आहेत. या दरम्यान वाद इतका पेटतो की महिला शिक्षका वर्गाबाहेर येतात आणि एकमेकींच्या झिंज्या उपटतात, लाथा-बुक्यांनी मारहाण करून लागता. अगदी शाळेच्या मैदानावर लोट पोट होऊन या महिला शिक्षिका मारहाण करतात.

यावेळी घटनास्थळी असलेल्या अनेक शिक्षिका हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतात.मात्र भांडण काय सुटत नाही.याउलट या शिक्षिका कुस्तीच्या मैदानासारखी तुफान मारामारी करतात. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ एकाने कॅमेरात कैद केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.

दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी शाळेवर आणि शिक्षकांवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. शाळे साऱख्या विद्येचा घराता कुस्तीचा आखाडा बनवल्याची टीका एका नेटकऱ्याने केले आहेत. तसेच जर शिक्षिका अशा भांडण असतील तर विद्यार्थ्यांची का अवस्था असेल? असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. जर शिक्षिकाच अशा भांडण असतील तर या विद्यार्थ्यांना काय शिकवणार? असा सवाल देखील उपस्थित केला आहे.

बिहारच्या पाटणामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट करून शिक्षकांवर टीका करण्यात आली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *