ऐ नको मारु गं! हाॅटेलमध्ये पतीला गर्लफ्रेंडसोबत धरताचं चपलेनं चांगलच चोपलं

आग्रा – उत्तर प्रदेशातील आग्रा येथे पती आणि त्याच्या प्रेयसीला एकत्र पाहून पत्नीचा राग अनावर झाला. एका हॉटेलच्या खोलीत पती दुसऱ्या महिलेसोबत चाळे करताना दिसला. त्यावेळी पत्नीनं पायातील चप्पल काढून पतीला धू धू धुतला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दिल्लीतील हे प्रकरण सध्या खूप गाजतंय.

देवरी रोड येथे राहणाऱ्या दिनेशवर त्याच्या पत्नीने आरोप केला आहे की, एका महिलेसोबत पतीचे अवैध संबंध आहेत. त्यावरून आमच्या दोघांमध्ये सातत्याने वाद होत असतात. पतीशी भांडणाला वैतागून पत्नी माहेरी निघून गेली. मात्र पती एका महिलेसोबत हॉटेलमध्ये असल्याचं पत्नीला कळालं. तेव्हा ती तिच्या भावासोबत हॉटेलमध्ये पोहचली.

ज्यावेळी पत्नी खोलीत शिरली तेव्हा आतील दृश्य पाहून तिचा राग अनावर झाला. दुसऱ्या महिलेसोबत पती रोमान्स करत होता. तेव्हा पत्नीनं पायातील चपलेने पतीला हाणलं त्याचसोबत त्या महिलेलाही बदडलं. यावेळी पती पत्नीची हात जोडून माफी मागत होता परंतु पत्नी काहीही ऐकण्यास तयार नव्हती. जेव्हा पत्नी पतीला आणि दुसऱ्या महिलेला मारत होती तेव्हा तिच्या भावाने हा व्हिडिओ शूट केला. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून सोशल मीडियात चर्चेचा विषय बनला.

या व्हिडिओत दिनेश पत्नीची वारंवार माफी मागताना दिसला. चूक झाली, पुन्हा असं करणार नाही. यावेळी माफ कर असं पती विनवण्या करत होता. तर महिलाही पत्नीची माफी मागत होती. यापुढे असं करणार नाही असं दुसरी महिला रागावलेल्या पत्नीला सांगत होती. रिपोर्टनुसार, हॉटेलमध्ये पती, पत्नी अन् वो चा हायवॉल्टेज ड्रामा खूप वेळ चालला. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

दिनेश आणि दुसऱ्या महिलेला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. महिलेचा पती एका नर्सिंग होममध्ये काम करतो. दोघांना एक १६ वर्षाची मुलगी आहे. जेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा अनेक यूजर्सने भन्नाट कमेंट्स दिल्या. कुणी या पत्नीला पती महिलेसोबत आहे असं कळवलं असेल. घोर कलयुग अशा विविध कमेंट्स यूजर्सने दिल्या.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *