‘Dj वाल्या आवाज वाढिव-वाढिव…’डिजेवाल्यानी आवाज वाढवला अन् पोरगं कायमच बहिर झालं

भंडारा : लग्न किंवा एखादी मिरवणूक म्हटलं की डिजे (DJ) वाजवण्याची सध्या फॅशच आहे. डीजेच्या मोठ्या आवाजाच्या तालावर तरुणाई थिरकताना दिसते. स्पीकरपासून अगदी फूटभर अंतरावर मिरवणूकीत अनेकजणं बेधुंद होऊन नाचत असतात. पण थोड्यावेळची मजा आयुष्यभराजी सजा ठरु शकते. ढोल ताशांचा दणदणाट, टोलचा ठोका, ह्दयाचा ठोका चुकविणाऱ्या डिजेच्या गगनभेदी आवाजामुळे कायमचं बहिरेपण येऊ शकतं. अशीच एक घटना पूर्व विदर्भातल्या भंडारा जिल्ह्यात घडली आहे.

काय आहे नेमकी घटना?
भंडारा (Bhandara) जिल्ह्यातल्या मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द इथं राहाणाऱ्या नितीन लिल्हारे या तरुणाला डीजेच्या आवाजाने (DJ Sound) आयुष्यभराची सजा मिळालीय. नितीनच्या घरात लग्न सोहळा होता. त्याच्या काकांच्या मुलाचं लग्न ठरलं. कुटुंबात लग्न सोहळा म्हटल्यावर उत्साहाचं वातावण होतं.

लग्नाची जोरदार तयारी करण्यात आली नवरदेवाची वरात निघाली. लग्नाची वरात म्हटल्यावर नाचगाणं हे आलंच. या वरातीतही मोठ्या आवाजात डीजे वाजवला जात होता. कुटुंबियांबरोबर मित्रपरिवारही सहभागी झाला होता. डीजेच्या तालावर सर्वजण थिरकत होते. नितीनही यात सहभागी होऊन बेधुंद नाचत होता.

कानाने आवाज येणं झालं बंद
लग्न सोहळा आटोपल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी गेले. नितीनही घरी आला,पण त्याला दोन्ही कानाने काहीच ऐकू येत न्हवतं. रात्रभर डीजेचा आवाज त्याच्या कानात गुंजत होता. डीजेच्या आवाजामुळे ऐकू येत नसेल, एक-दोन दिवसात सर्वकाही ठिक होईल असं नितीनला आणि त्याच्या कुटुंबियांना वाटलं.

पण एक-दोन नाही तर तब्बल आठ दिवसांनंतरही नितीनला कानाने ऐकू येत नसल्याने अखेर त्याने डॉक्टरकडे जाण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी तपासणी केली आणि रिपोर्ट आले. रिपोर्ट पाहून नितीनला धक्काच बसला. नितीनच्या एका कानाला कायमचं बहिरेपण आलं होतं. तर दुसऱ्या कानाने केवळ 15 ते 20 टक्के आवाज येत होता.

मोठ्या आवाजाचा परिणाम
डीजे, स्पिकर, ढोलताशांच्या सानिध्यात बराच वेळ राहिल्यास लहान मुलं, वयस्कर व्यक्ती यांच्या कानावर परिणाम होऊ शकते. गर्भवती महिलांच्या विशेषत: त्यांच्या गर्भातील बाळावर या मोठ्या आवाजाचा परिणाम होऊ शकतो. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार डीजेचा आवाज जवळपास 140 डेसिबलहून अधिक असतो. इतक्या मोठा आवाजाने कायमचं बहिरेपणही येऊ शकतं

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *